अभिनेत्री जूही चावलाच्या भावाचं निधन

Last Updated: Sunday, March 9, 2014, 17:01

बॉलिवूड अभिनेत्री जूही चावलाच्या भावाचं बॉबी चावलाचं आज सकाळी मुंबईतल्या जसलोक हॉस्पिटलमध्ये निधन झालं. ते २०१० पासून कोमात होते. हॉस्पिटलमधील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

‘गुलाब गँग’च्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा

Last Updated: Friday, March 7, 2014, 08:47

अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि जुही चावला यांच्या ‘गुलाब गँग’ सिनेमावरील बालंट टळले आहे. त्यामुळे हा चित्रपट आजपासून देशात प्रदर्शित होत आहे. सर्वोच्च न्यायालयाने या सिनेमावरील बंदी उठवली आहे.

...तर मी अण्णांप्रमाणे उपोषणाला बसेन : संपत पाल

Last Updated: Tuesday, February 11, 2014, 22:15

येत्या ७ मार्चला माधुरीचा `गुलाबी गँग` प्रदर्शित होतोय. जसजशी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जवळ येतेय तसतसा संपत पाल यांचा पारा वाढत चाललाय. `माझ्या परवानगीशिवाय चित्रपट प्रदर्शित केला तर मी अण्णा हजारेंसारखी उपोषणाला बसेन` असा पवित्रा संपत पाल यांनी घेतलाय.

`गुलाब गँग`मुळे माधुरी, जुहीच्या अभिनयात तुलना

Last Updated: Sunday, January 19, 2014, 23:56

अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि जुही चावला गुलाब गँग चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदा एकाच चित्रपटात प्रेक्षकांना दिसणार आहेत. म्हणून जुही आणि माधुरी यांच्या अभिनयाची तुलनाही सुरू झाली आहे.

माधुरी सोबत नव्हतं करायचं काम- जुही चावला

Last Updated: Wednesday, January 15, 2014, 11:10

अभिनेत्री जुही चावला जी पहिल्यांदाच माधुरी दीक्षित सोबत ‘गुलाब गँग’ चित्रपटात झळकणार आहे. ती म्हणते, की पहिले तिला माधुरी दीक्षितसोबत करायचं नव्हतं आणि भविष्यातही करेल असं वाटत नाही. माधुरी दीक्षित आणि जुही चावला या नव्वदच्या दशकातल्या स्पर्धक अशा अभिनेत्री आहेत आणि त्यांनी कधीही एकत्र चित्रपटात काम केलं नव्हतं.

माधुरीच्या `गुलाब गँग`चा ट्रेलर आला रे आला....

Last Updated: Friday, January 10, 2014, 11:16

गेल्या काही दिवसांपासून प्रतिक्षा असलेला माधुरी दीक्षितचा गुलाब गँग याच चित्रपटाचा प्रोमो प्रसिद्ध झाला आहे. प्रमुख भूमिकेत माधुरी दीक्षित असून जुही चावला आणि माधुरीने प्रथमच काम केले आहे.

जुही चावलाचा नरेंद्र मोदींना नकार

Last Updated: Thursday, August 2, 2012, 12:08

आपल्या पक्षात कलाकारांचं ग्लॅमर आणण्याचा प्रकार नवीन नाही. गुजराथचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनीही जुही चावला हिला आगामी विधानसभा निवडणुकीत उभं राहाण्याची विनंती केली होती. मात्र जुही चावलाने नरेंद्र मोदींना चक्क नकार दिला.

‘सन ऑफ सरदार’च्या सेटवर लाइटमनचा मृत्यू

Last Updated: Wednesday, March 14, 2012, 10:49

अजय देवगणच्या आगामी 'सन ऑफ सरदार' या सिनेमाच्या सेटवर लाइटमनचा मृत्यू झाला. मिळालेल्या वृत्तानुसार लाइटमन मच्छिंद्र अरवेळ (बाळा) याचा विजेचा धक्का लागून जागच्या जागीच मृत्यू झाला.