उद्धव यांची म्हात्रे-राऊळ यांच्याशी भेट, घोसाळकरांवर कारवाई?

Last Updated: Saturday, February 1, 2014, 17:48

शिवसेनेच्या नाराज नगरसेविका शीतल म्हात्रेंची अखेर उद्दव ठाकरेंनी भेट घेतलीय. उद्धव ठाकरेंनी शीतल म्हात्रे, शुभा राऊळ आणि मनीषा चौधरी या तिघा नगरसेविकांना उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलवून घेतलं. त्यांच्याशी संवाद साधला. आणि विनोद घोसाळकरांवर लवकरात लवकर कारवाईचं आश्वासन दिलं.

शीतल म्हात्रेंचे आरोप आमदार घोसाळकर यांनी फेटाळले

Last Updated: Wednesday, January 15, 2014, 21:10

आमदार विनोद घोसाळकर यांनी शीतल म्हात्रे यांनी लावलेले आरोप फेटाळून लावले आहेत. पक्ष नेतृत्वाने प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते, मात्र माजी महापौर शुभा राऊळ आणि नगरसेविका शीतल म्हात्रे या चौकशीच्या बैठकीला उपस्थित राहिले नसल्याचं विनोद घोसाळकर यांनी म्हटलं आहे.

फेसबुक स्टेटसवरून शुभा राऊळ यांनी व्यक्त केली नाराजी

Last Updated: Monday, January 13, 2014, 13:35

शिवसेनेत सध्या महिला नगरसेविकांची मुस्कटदाबी होतेय. शिवसेनेच्या रणरागिणींना सध्या पक्षातील स्वकियांविरूद्धच दोन हात करावे लागतायेत. स्थानिक नेतृत्वावर आपली नाराजी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.

सचिनला मुंबईसाठी वेळ आहे का?

Last Updated: Tuesday, May 1, 2012, 13:03

सचिनकडे मुंबईसाठी वेळ नसल्याची खंत माजी महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी व्यक्त केलीय. महाराष्ट्र दिनीनिमीत्त मुंबईच्या अठरा माजी महापौरांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता.