कल्याण-डोंबिवली पालिकेत स्थायी समिती शिवसेनेकडे

Last Updated: Tuesday, April 29, 2014, 12:57

कल्याण-डोंबिवली महापालिका स्थायी समितीसाठी आज निवडणूक झाली. या निवडणुकीसाठी शिवसेनेचे दीपेश म्हात्रे विजयी झालेत. दरम्यान, मनसेच्या उमेदवारीमुळे या निवडणुकीत घोडेबाजाराला ऊत आला होता. फोडाफोडी करूनही मनसेला पराभवाचा सामना करावा लागला. या निवडणुकीत राष्ट्रवादी तटस्थ राहिल्याने सेनेला फायदा झाला.

अर्चना कोठावदे यांच्या अपहण नाट्याला वेगळ वळण

Last Updated: Tuesday, April 29, 2014, 19:27

कल्याण-डोंबिवली मनपाच्या नगरसेविका अर्चना कोठावदे यांच्या अपहण नाट्याला आता वेगळ वळण आलंय. अर्चना कोठावदे यांनी माझं अपहण झालं नसून मी सुखरूप असल्याचा खुलासा केलाय.

सत्ता शिवसेनेची, तिजोरीच्या चाव्या चक्क मनसेकडे

Last Updated: Saturday, April 26, 2014, 11:05

लोकसभा निवडणुकीत एकमेकासमोर उभ्या ठाकलेल्या शिवसेना-भाजप,मनसे आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या ठाणे महापालिकेतील दिग्गजांनी सत्तेसाठी पुन्हा एकदा अजब साटेलोटे केलं. ठाणे महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या चक्क मनसेच्या हवाली केल्याने ठाणेकरांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.

ठाण्याच्या तिजोरीच्या चाव्या काँग्रेसकडे; फाटक विजयी

Last Updated: Tuesday, October 16, 2012, 12:50

ठाणे महापालिका स्थायी समितीची आज निवडणूक पार पडली. यानिवडणुकीत आघाडी गटाचे उमेदवार रवींद्र फाटक यांनी बाजी मारलीय.

ठाण्याची निवडणूक स्थायी; पक्षांचं चित्त नाही ठायी

Last Updated: Tuesday, October 16, 2012, 09:42

ठाणे महापालिका स्थायी समितीची आज निवडणूक होतेय. या निवडणुकीत कोण बाजी मारतंय याकडं साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.

जगदीश शेट्टीच्या निवडीनंतर राष्ट्रवादीत हलचल

Last Updated: Saturday, April 7, 2012, 23:19

पुण्यातील पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे जगदीश शेट्टी यांची निवड झालीय. नवनाथ जगताप यांच्या माघारीने ही निवड बिनविरोध झाली. शेट्टी हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय आहेत. तसंच शहराध्यक्ष आझम पानसरे यांच्या गटातले मानले जातात. शेट्टी यांना राष्ट्रवादीच्याच आमदारांचा विरोध असल्यानं निवडीत चुरस होण्याची शक्यता होती. मात्र जगताप यांनी ऐनवेळी माघार घेतल्यानं शेट्टी यांचा मार्ग सुकर झाला.

ठाणे स्थायी समिती निवडणूक रेंगाळलेलीच

Last Updated: Thursday, April 5, 2012, 08:55

ठाण्यातील महापौर निवडणूकीची रणधुमाळी संपली तरी अजून स्थायी समितीची निवडणूक रेंगाळली आहे. त्यातच सत्ताधारी शिवसेना महायुती आणि राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीला समसमान पाठिंबा आहे.

कल्याणात स्टॅडिंग, सेना आणि मनसेत अंडरस्टॅडिंग?

Last Updated: Tuesday, April 3, 2012, 15:42

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समितीच्या निवडणुकीत मनसेने तटस्थ राहत शिवसेनेचा मार्ग मोकळा करुन दिला. त्यामुळेच शिवसेनेचे मल्लेश शेट्टी स्थायी समितीच्या अध्यक्षपदी निवडून आले आहेत.