`सिडको`ची बहुप्रतिक्षित घरं सर्वसामान्यांसाठी खुली!

Last Updated: Friday, January 17, 2014, 09:55

सर्वसामान्यांसाठी ‘सिडको’नं खुशखबर दिलीय. सिडकोनं खारघर सेक्टर ३६ मध्ये उच्च आणि मध्यम उत्पन्न गटासाठी बांधण्यात येणाऱ्या १,२४४ घरांसाठी नोंदणी आजपासून (१६ जानेवारी) सुरू केलीय.

चला तर, नवी मुंबईतील विमानतळाचा प्रश्न मार्गी

Last Updated: Wednesday, October 30, 2013, 08:15

अखेर नवी मुंबईतील उलवे येथील विमानतळाचे घोडे गंगेत न्हाले आहे. होणार की नाही, याची चर्चा जोर धरत असताना सिडकोने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने सर्व कागदपत्रे पाहून खारफुटी तोडण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे ज्या प्रश्नावर विमानतळाचे टेक ऑफ रखडले होते. ते आता मार्गी लागले आहे. दरम्यान, नवी मुंबईतील जागांचे आणि घरांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.

दिवाळीच्या शुभमुहूर्तावर ‘सिडको’ची खुशखबर!

Last Updated: Wednesday, October 9, 2013, 15:09

नवी मुंबईत घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी ‘सिडको’ दिवाळीच्या शुभमुहूर्तावर खुशखबर देण्याच्या तयारी आहे. होय, कारण...

जितेंद्र आव्हाड यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

Last Updated: Wednesday, February 13, 2013, 21:19

दुष्काळग्रस्तांच्या निधीसाठी सिडको, म्हाडा आणि एमएमआरडीएने 50 टक्के निधी द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे ठाण्यातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. याबाबत आव्हाड यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पत्र पाठवलंय.

‘सिडको’कडून खुशखबर… ५६६० घरं बांधणार!

Last Updated: Wednesday, January 9, 2013, 07:51

`सिडको`नं आपली नवी योजना जाहीर करत सर्वसामान्यांना थोडा दिलासा दिलाय. नवी मुंबईत खारघर परिसरात सिडको ५६६० घरे बांधणार आहे. सिडको संचालक मंडळाच्या बैठकीत याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आलाय.

स्वतःला मृत घोषित करून 'सिडको' भूखंड लाटला

Last Updated: Thursday, July 19, 2012, 20:18

स्वत:ला मृत घोषित करून सिडको अधिकार्‍यांच्या संगनमताने भूखंड हडप केल्याचा प्रकार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उघडकीस आणला आहे. याप्रकरणी दोन माजी व दोन विद्यमान अधिकार्‍यांसह एकूण १२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, चार जणांना अटक करण्यात आली आहे.

'झी २४तास'चा छडा; सिडकोनंही घेतला धडा

Last Updated: Wednesday, June 27, 2012, 09:06

‘झी 24 तास’च्या दणक्यानंतर अखेर नवी मुंबईतल्या सिडको भवनात फायर ऑडिट झालं. शिवाय इमारतीमधल्या कुचकामी कालबाह्य अग्निशमन उपकरणंही तातडीने बदलण्याचे आदेश देण्यात आलेत.

सिडकोचा डाव, एकीकडे आश्वासन, दुसरीकडून घाव!

Last Updated: Thursday, January 12, 2012, 17:18

नवी मुंबई परिसरातील प्रकल्पग्रस्तांच्या तात्पुरत्या घरांवरुन सिडकोनं दुटप्पी भुमिका घेतली आहे. गरजेपोटी बांधलेली ही घरं नियमित करण्यासाठी सिडकोनं एकीकडे हालचाली सुरू केल्या आहेत. तर दुसरीकडे याच घरांना पाडण्याच्या नोटीसाही देण्यात आल्या आहेत.