सोशल मीडीयावर अफवा, पुणे-मुंबई एक्स्प्रेसवर पडसाद

Last Updated: Sunday, June 1, 2014, 19:02

सोशल नेटवर्किंग साईटवर आक्षेपार्ह आणि संतापजनक पोस्ट टाकल्याने याचे पडसाद पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर दिसून आले आहेत. काहींनी या हायवेवर वाहने रोखून धरल्याने काहीकाळ महामार्गावरील वाहतूक खोळंबळी होती. दरम्यान, पुणे, साताऱ्यामध्ये बंद पाळण्यात आलाय. मात्र, ही पोस्ट अफवा असल्याचे पुढे आले आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात, पुण्याचे ३ ठार

Last Updated: Saturday, August 17, 2013, 23:41

पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर टायर फुटल्याने इनोव्हा मोटार डिव्हाडरवर आदळून झालेल्या अपघातात तीन तरुण ठार झाले आहेत. तर दोन जण गंभीर जखमी झाले.

एकाच कुटुंबातील पाच जणांवर मृत्यूचा घाला

Last Updated: Monday, May 27, 2013, 12:02

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर रविवारी सायंकाळी कार्ल्याजवळ झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुबातील चार जण जागीच ठार झालेत. तर एकाचा रूग्णालायात मृत्यू झाला. वासकर कुटुंब देवदर्शनासाठी गेले होते.

टँकर-पोलीस व्हॅनमध्ये अपघात, ३२ पोलीस जखमी

Last Updated: Tuesday, February 26, 2013, 09:38

इतरांना सुरक्षा पुरविणारे पोलीसच असुरक्षित असल्याचं आज दिसून आलंय. सोमवारी रात्री उशीरा पोलीस व्हॅन आणि टँकरमध्ये झालेल्या अपघातात ३२ पोलीस जखमी झालेत.

`मुंबई-पुणे एक्सप्रेस वे`वर पुन्हा अपघात; पाच जण जागीच ठार

Last Updated: Monday, January 28, 2013, 12:57

मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर झालेल्या कार अपघातात पाच जण जागीच ठार तर दोन जण जखमी झालेत. मुंबईहून पुण्याकडे भरधाव निघालेल्या स्विफ्ट कारनं डिव्हायडर तोडून दुसऱ्या बाजूनं येणाऱ्या ‘इको’ला धडक दिल्यानं हा अपघात घडलाय.

नदीवर पूल, सरकारची नुसतीच हूल

Last Updated: Wednesday, July 11, 2012, 12:21

मुंबई - पुणे एक्सप्रेस वे ही राज्याची शान आहे. मात्र ज्या खालापूर तालुक्यातून हा एक्सप्रेस वे गेलाय त्याच गावांमधले नागरिक अक्षरशः तारेवरची कसरत करत नदी ओलांडतात. वर्षानुवर्षे कैफियत मांडूनही पूल बांधला जात नसल्यानं सरकारच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह उभं राहतंय.

पुणे एक्सप्रेसवर ४० गाड्यांचा अपघात

Last Updated: Sunday, June 10, 2012, 00:03

मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर कामशेत बोगद्याजवळ झालेल्या विचित्र अपघातात तब्बल ४० वाहने एकावर एक आदळली. या अपघातात १० जण किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातामुळे एक्स्प्रेस वेवर वाहतुकीची मोठ्या प्रमाणावर कोंडी झाली आहे.

इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर ऑईल टँकर पलटी

Last Updated: Friday, November 11, 2011, 08:23

मुंबईत इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर काल रात्री एक ऑईल टँकर पलटी झाल्यानं अपघात झाला. हा टँकर मुंबईहून नाशिककडे जात होता. टँकर पलटी झाल्यानं रस्त्यावर सर्वत्र तेलाचा तवंग पसरला होता त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूकीचा खोळंबा झाला. अखेर अग्नीशमन दलानं तेलाच्या तवंगावर माती टाकल्यानं वाहतूक सुरळीत झाली.