सल्लू प्रकरण : तो धमकीचा फोन कोणाचा, वकिलाचा नंबर कसा?

Last Updated: Thursday, May 8, 2014, 08:22

२००२ सालच्या बांद्रा येथील `हीट अॅण्ड रन` प्रकरणात सिने अभिनेता सलमान खानच्या अडचणीत वाढ झालीय. एकीकडे तिन्ही प्रमुख साक्षीदारांनी सलमानला न्यायालयात ओळखलं असताना, या प्रकरणातील प्रमुख साक्षीदाराला धमक्या देण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय. ज्या फोनवरुन धमकीचा फोन आला, तो एका वकिलाचा नंबर आहे. त्यामुळे सलमानच्या मागे आणखी एका चौकशीचा ससेमिरा लागण्याची शक्यता आहे.

सलमान खान हिट अँड रन प्रकरणातील साक्षीदाराला धमक्या

Last Updated: Tuesday, May 6, 2014, 20:52

सलमान खान हिट अँड रन प्रकरणातील प्रमुख साक्षीदार मुस्लिम शेख याला धमक्या देण्यात आल्यात. मुस्लिम शेखची आज सेशन्स कोर्टात साक्ष होणार होती. मात्र साक्षीपूर्वीच त्याला धमक्या देण्यात आल्याचा दावा मुस्लिम शेखनं पत्राद्वारे न्यायालयापुढं केलाय. 5 लाख रूपये घे आणि तोंड बंद कर, अशी धमकी त्याला देण्यात आलीय.

`हिट अँड रन` प्रकरणी सलमानला ६ मे रोजी हजर राहण्याचे आदेश

Last Updated: Monday, April 28, 2014, 17:02

२००२ सालातील हिट अँड रन प्रकरणी सलमान खान आज मुंबई सत्र न्यायालयात हजर राहणार आहे. नवीन खटल्याची सुरुवात असल्यानं न्यायालयानं सलमान खानला हजर राहण्याचे आदेश दिले होते.

‘हीट अँड रन’ सलमानला दिलासा, नव्यानं होणार सुनावणी

Last Updated: Thursday, December 5, 2013, 15:28

हीट अँड रन प्रकरणात यापुढं सलमान खानवर सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याअंतर्गत नव्यानं खटला चालवला जाणार आहे. या संदर्भातला अर्ज सलमान खाननं सत्र न्यायालयात दाखल केला होता. न्यायालयानं हा अर्ज मंजूर करून घेतलाय. त्यानुसार २३ डिसेंबरपासून नव्यानं खटल्याची सुनावणी होणार आहे.

कोर्टाने उतरवला सलमान खानचा तोरा !

Last Updated: Saturday, July 20, 2013, 11:43

न्यायालयात दबंगगिरी करीत पब्लिकमध्ये गप्पा मारत बसलेल्या सलमानला न्यायाधीशांनी थेट आरोपीच्या पिंजर्‍यात पाठवून त्याला त्याची जागा दाखविली. पब्लिकसाठी असलेल्या जागेवरून ऊठ आणि आरोपीच्या पिंजर्‍यात जाऊन बस’,असे न्यायाधीशांनी सुनावताच सलमानची दबंगगिरी एका क्षणात उतरली.

सलमान खानची २४ जुलैला सुनावणी

Last Updated: Friday, July 19, 2013, 14:04

अभिनेता सलमान खानच्या हीट अँण्ड रनप्रकरणी मुंबई सेशन कोर्टानं आजची सुनावणी पुढे ढकलली आहे. आता २४ जुलैला सुनावणी होणार आहे.

कार अपघात : अंधेरीतून ड्रायव्हला अटक

Last Updated: Monday, February 18, 2013, 13:37

मुंबईतील अंधेरीत हिट एन्ड रनचं प्रकरणी फरार झालेल्या ड्रायव्हरला वर्सोवा पोलिसांनी अटक केलीये. त्याच्याकडून मर्सिडिझ कारही जप्त करण्यात आलीये.