गडकरींना आयकर विभागाकडून क्लीन चीट!

Last Updated: Monday, May 12, 2014, 14:13

भाजपाचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांना आयकर विभागाकडून क्लिन चीट मिळाली आहे. गडकरींविरोधात कुठलंही प्रकरण प्रलंबित नसल्याचं आयकर विभागानं स्पष्ट केलंय.

पॅनबाबत ऑनलाईन अर्ज, करा बदल

Last Updated: Wednesday, August 14, 2013, 10:11

तुम्हाला नवे पॅन कार्ड काढायचे आहे. तर ते कोणाची मदत न घेता काढता येऊ शकणार आहे. किंवा पॅनमध्ये अद्यावत माहिती असायला पाहिजे. तसेच बदल करायचा असेल तर आता ऑनलाईन अर्ज करू शकता. त्यामुळे तुम्ही घर बसल्या हे काम करू शकणार आहात.

जन्म दाखला नसेल तर ...पॅनकार्ड मिळेल का?

Last Updated: Friday, July 5, 2013, 14:56

बनावट पॅनकार्ड बनवून फसविण्याचे अनेक प्रकार उघडकीस आलेत. या प्रकरणांना आळा घालण्यासाठी सरकारने कठोर पाऊल उचलले आहे. आता जर तुम्हाला पॅनकार्ड काढायचे असेल तर तुमचा जन्म दाखला मस्ट आहे.

पार्थिव पटेल करणार शिपायाची नोकरी !

Last Updated: Wednesday, June 26, 2013, 11:30

टीम इंडियातून डच्चू मिळालेला आणि भारतीय संघात ‘ओपनिंग बॅट्समन’ म्हणून ओळख असलेल्या पार्थिव पटेलवर आता शिपाई म्हणून नोकरी करण्याची वेळ आलीय.

`अभि-अॅश`चा स्वामी १५ किलो सोन्याच्या बेडवर झोपतो!

Last Updated: Tuesday, May 14, 2013, 16:28

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या विवाहाआधी पत्रिका जुळवून वर्तमानपत्रांच्या हेडलाईन्समध्ये आलेल्या बाबांचा भलताच थाट-माट आता समोर आलाय. या बाबांचा थाट एखाद्या राजा-महाराजालाही लाजवेल असाच आहे.

गडकरींची स्वप्न‘पूर्ती’ धोक्यात!

Last Updated: Wednesday, January 23, 2013, 09:52

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या पूर्ती उद्योग समूहातील मुंबईत नोंदणी झालेल्या कंपन्यांची चौकशी प्राप्तिकर खात्यामार्फत करण्यात येत आहे. पूर्ती कंपनीशी संबंधित मुंबईतील नऊ ठिकाणांवर प्राप्तिकर खात्यामार्फत मंगळवारी छापे टाकण्यात आले.

'बंटी-बबली'कडून लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याला अटक...

Last Updated: Tuesday, January 15, 2013, 16:51

सीबीआयने आयकर विभागाचे माजी उपसंचालक योगेंद्र मित्तल यांच्या घरी छापे मारलेत. योगेंद्र मित्तल असं या अधिका-याचं नाव आहे.

'केबीसी'तून भारी मिळकत : अमिताभला नोटीस

Last Updated: Tuesday, January 8, 2013, 15:37

‘कौन बनेगा करोडपती’मधून दुसऱ्यांना करोडपती बनवता बनवता अमिताभला स्वत:लाच आयकर विभागाच्या कारवाईला सामोरं जावं लागतंय.

राजकीय पक्षांना करसवलतीची मेहबान

Last Updated: Monday, December 3, 2012, 11:15

राजकीय पक्षांना मागील पाच वर्षात तब्बल अडीच हजार कोटी रूपयांची करमाफी दिली गेल्याची बाब माहितीच्या अधिकारात उघड झाली आहे.प्राप्तीकर खात्यानं दिलेल्या या खैरातीचा सर्वाधिक फायदा काँग्रेस आणि भाजपला झाला आहे. मागील पाच वर्षात काँग्रेसला १३८५ तर भाजपला ६८२कोटी रूपयांची करमाफी प्राप्तीकर खात्यानं दिलीय.

झवेरी बाजारात ३४ सराफांच्या पेढींवर छापे

Last Updated: Sunday, November 11, 2012, 09:51

दिवाळीच्या तोंडावर आणि धनत्रयोदशी या दिवशी झवेरी बाजारातील सोन्याची खरेदी विक्री उच्चांक गाठत असते. मात्र, काही सराफ दुकानदार ‘बाजार’ करतात. याला लगाम घालण्यासाठी आयकर विभागाने ३४ सराफांच्या पेढींवर छापे मारून दिवाळीचा धमाका उडवून दिलाय.