जबरी चुंबन पडले महाग, मुलीने तोडली जीभ

Last Updated: Thursday, February 6, 2014, 11:00

जबरदस्तीने किस करणाऱ्या मुलाला एखाद्या मुलीने काना खाली लगावली असे तुम्ही ऐकले असेल पण अशा प्रकारे जबरदस्ती करणाऱ्या मुलाची चक्क जीभ चावा घेऊन तोडल्याची घटना तुमच्या ऐकिवात नसेल.... पण असे घडलं मध्य प्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळमध्ये

श्रुती हसनचा हल्लेखोर सापडला

Last Updated: Sunday, November 24, 2013, 09:20

मुंबई प्रख्यात अभिनेते कमल हासन यांची मुलगी अभिनेत्री श्रुती हासन (२७) हिच्या घरात घुसून तिच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी अशोक शंकर त्रिमुखे (३२) याला शनिवारी अटक केली. तो गोरेगावच्या चित्रनगरीतील कर्मचारी आहे.

अॅसिड हल्ला : `ती`च्या प्रकृतीत सुधारणा

Last Updated: Monday, October 21, 2013, 00:09

एकतर्फी प्रेमातून एका तरूणाने तरूणीला जबरदस्तीने अॅसिड पाजल्याची घटना बोरिवलीच्या गोराई बीच परिसरात घडलीय. संशयीत आरोपी जितेंद्र सकपाळला पोलिसांनी अटक केलीय. पीडित तरुणीची प्रकृती आता सुधारत असल्याची माहिती मिळतेय.

प्रियकरानं प्रेयसीला पाजलं अॅसिड, तरुणाला अटक

Last Updated: Sunday, October 20, 2013, 12:00

मुंबईत अॅसिड हल्ल्याची पुन्हा एक घटना घडलीय. शहरातील गोराई बिचवर काल रात्री एका १८ वर्षीय तरुणीला तिच्या प्रियकरानं जबरदस्तीनं अॅसिड पाजल्याचा प्रकार घडलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, तिची प्रकृती गंभीर आहे. तर तरुणाला पोलिसांनी अटक केलीय.

तरूणीची छेडछाड : आत्महत्या केल्याप्रकरणी तीन पोलीस निलंबित

Last Updated: Thursday, October 17, 2013, 13:02

छेडछाडीला कंटाळून एका महाविद्यालयीन तरूणीने आत्महत्या केल्याप्रकरणी तीन पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या तिघांमध्ये एक पोलीस निरीक्षक आणि दोन पोलीस कॉन्स्टेबल्सचा समावेश आहे.

छेडछाडीला कंटाळून महाविद्यालयीन तरूणीची आत्महत्या

Last Updated: Wednesday, October 16, 2013, 12:34

छेडछाडीला कंटाळून एका महाविद्यालयीन तरूणीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमाराला तळेगाव दाभाडे इथे मंगळवारी हा प्रकार घडलाय.

वांद्र्यात छेडछाड काढणाऱ्यांना महिलांचा चोप

Last Updated: Tuesday, October 1, 2013, 21:41

मुंबईत छेडछाडीच्या घटना थांबताना काही दिसत नाहीय. नुकतीच वांद्रेमध्ये एका कामगार महिलेची छेड काढल्याचं उघड झालंय.

महिलेची छेड रोखणाऱ्या शिवसैनिकाची हत्या!

Last Updated: Monday, September 23, 2013, 17:15

महिलेची छेड काढणाऱ्या तरुणांना जाब विचारल्याच्या कारणावरून शिवसेना शाखा प्रमुखाची हत्या करण्यात आल्याची घटना पुण्यात घडलीय. देवा खांडेकर असं या शाखा प्रमुखाचे नाव आहे.