Last Updated: Tuesday, April 29, 2014, 12:57
कल्याण-डोंबिवली महापालिका स्थायी समितीसाठी आज निवडणूक झाली. या निवडणुकीसाठी शिवसेनेचे दीपेश म्हात्रे विजयी झालेत. दरम्यान, मनसेच्या उमेदवारीमुळे या निवडणुकीत घोडेबाजाराला ऊत आला होता. फोडाफोडी करूनही मनसेला पराभवाचा सामना करावा लागला. या निवडणुकीत राष्ट्रवादी तटस्थ राहिल्याने सेनेला फायदा झाला.