साखर कारखान्यांनी केला गळीत हंगामाचा शुभारंभ

Last Updated: Wednesday, November 6, 2013, 21:47

राज्यातील जवळपास सगळ्याचं साखऱ कारखान्यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर यंदाच्या गळीत हंगामाचा शुभारंभ केला. पण कोणत्याच साखर कारखान्याने उसाला पहिली उचल किती देणार हे अजुन जाहीर केलेलं नाही..त्यामुळं उस दराबाबात राज्यात तिढा निर्माण झालाय. त्यामुळं आता 8 नोव्हेंबरला होणा-या स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या मेळाव्याकडे सर्वांच लक्ष लागलंय़.

सरकारच्या छुप्या आशीर्वादाने साखर कारखान्यांची मुजोरी

Last Updated: Tuesday, October 29, 2013, 19:29

राज्यात साखर कारखान्यांच्या मुजोरीमुळे लेव्हीची साखर अद्याप सर्व सामान्यांना मिळू शकलेली नाही. नाशिक जिल्ह्यातील शेकडो घरे आज ऐन दिवाळीत गोडधोड तयार करू शकलेली नाहीत. विशेष म्हणजे राजकीय प्रभाव असलेल्या सत्ताधाऱ्यांचे पुणे बारामती आणि सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक कारखाने यामध्ये आढळून आले आहेत.

शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याला चोप

Last Updated: Wednesday, November 9, 2011, 05:48

सोलापूरमधल्या पंढरपूर इथं शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे. साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी मारुती जाधव या कार्यकर्त्याला ही मारहाण केली आहे. याप्रकरणी पंढरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारखान्यांसाठी साखरेची चव कडवट

Last Updated: Tuesday, November 1, 2011, 16:07

यंदाच्या गळीत हंगामात महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखाने आर्थिक आरिष्ट कोसळ्याची चिन्हं दिसत आहेत. सहकारी साखर कारखान्यांकडे मागील वर्षीचा ३.५ दशलक्ष टनांचा शिल्लक साठा पडून आहे.

उसाचा गोडवा कायम राहणार ?

Last Updated: Sunday, October 30, 2011, 10:16

सांगलीत उस दर निश्चिती संदर्भात शेतकरी संघटना आणि साखर कारखानदार यांच्यात महत्वपूर्ण बैठक झाली. राज्य मंत्रिमंडळाच्या तीन नोव्हेंबर पर्यंतच्या बैठकीपर्यंत सांगलीतील सर्व साखर कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.