ऊसाची भरपाई छातीवर बसून काढून घेऊ - राजू शेट्टी

Last Updated: Friday, November 8, 2013, 22:50

यावर्षी ऊसाला पहिली उचल ३ हजार रुपये विनाकपात मिळाली पाहिजे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केलीय. अन्यथा छातीवर बसून भरवाई घेऊ, असा इशारा देत शेतकरी संघटनेनं यासाठी राज्य सरकारला १५ नोव्हेंबरपर्यंत मुदत दिलीय. मागणी मान्य न झाल्यास १५ नोव्हेंबरपासून कराडमध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी आंदोलनाचा इशारला शेट्टी यांनी दिलाय.

ऊसाला २५०० रूपये भाव

Last Updated: Monday, November 19, 2012, 16:02

सांगली जिल्ह्यतील इस्लामपूरमध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या साखर कारखानदारांची काल बैठक झाली. यात ऊसाला प्रतिटन २५०० रुपयाचा पहिला हप्ता देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. हा दर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं मान्य केला असून, उसाचं आंदोलन स्थगित करण्यात आलंय.

ऊस आंदोलक आणि पोलिसांत धुमश्चक्री

Last Updated: Thursday, November 15, 2012, 20:37

पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात ऊस आंदोलन काही थांबताना दिसत नाहीये. जिल्ह्यातील ३० हून अधिक गावांमध्ये आज निषेध मोर्चा आणि बंद पाळण्यात आला. काही ठिकाणी आंदोलक आणि पोलिसांत धुमश्चक्री झाली.

ऊस आंदोलन चिघळलं, एसटी सेवा पुन्हा बंद

Last Updated: Wednesday, November 14, 2012, 17:45

ऊसदर आंदोलनामुळं पश्चिम महाराष्ट्रात सकाळी सुरु करण्यात आलेली एसटी सेवा पुन्हा बंद करण्यात आलीये. आंदोलनामुळं सांगली एसटी सेवा पुन्हा बंद करण्यात आलीये. सांगली-इस्लामपूर मार्गावर रास्ता रोको करण्यात आला.

पेटवा पेटवी

Last Updated: Wednesday, November 14, 2012, 18:13

काही प्रश्न सोडविण्याऐवजी ते धगधगत कसे राहतील यावर भर दिला जातो. किमानपक्षी जर प्रश्न सोडवता येत नसतील तर भाष्य करून किंवा आपणच तारणहार म्हणून त्यात डोकं खुपसू नये आणि पेटवा पेटवीची भाषा करू नये. यात शेतकरी आणि सरकारचे हित साध्य होत नाही, हेच खरे आहे.

ऊस पेटला, पोलिसांची जीपच पेटवली

Last Updated: Wednesday, November 14, 2012, 12:34

ऊस दरवाढीसाठी करण्यात आलेले आंदोलन अधिकच पेटत आहे. आज कोल्हापूर जवळील दिंडनेर्ली फाट्याजवळ पोलिसांची जीप आंदोलनकर्त्या जमावाने पेटविली. त्यामुळे ऊस आंदोलन भडकण्याची परिस्थितीवरून शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, सुरू करण्यात आलेली एसटी सेवा पुन्हा काही तासाच बंद करण्यात आलीय.

प. महाराष्ट्रातील बंद एसटी सेवा सुरु

Last Updated: Wednesday, November 14, 2012, 11:10

ऊस दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पुकारलेल्या आंदोलनानंतर बंद ठेवण्यात आलेली पश्चिम महाराष्ट्रातली एसटी सेवा आज सुरु करण्यात आली.

खासदार राजू शेट्टींची दिवाळी जेलमध्ये

Last Updated: Tuesday, November 13, 2012, 09:39

ऊसाला ३००० रूपये दर देण्यासाठी छेडण्यात आलेल्या आंदोलनाला गालबोट लागले. आंदोलन करणाऱ्यांनी जाळपोळ आणि तोडफोड केल्याने पोलिसांनी गोळीबार केला. त्यातच ऊसदरासाठी आंदोलन सुरु करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, सतीश काकडे यांच्यासह इतर सहा जणांना चौदा दिवसांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, देण्यात आली. त्यामुळे त्यांची दिवाळी जेलमध्ये साजरी होत आहे.

ऊस आंदोलन पेटलं, राजू शेट्टी ताब्यात, बस जाळली

Last Updated: Monday, November 12, 2012, 10:55

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांना इंदापूरमधून पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तर दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यातल्या लोणीदेवकर इथं संतप्त शेतक-यांनी बस जाळलीये. दोन ते तीन बसच्या काचा फोडण्यात आल्यात. तर अनेक बस बंद पाडण्यात आल्यात.