राज ठाकरे काँग्रेसचा भालू – रामदास आठवले

Last Updated: Monday, April 7, 2014, 20:37

रिपाइं नेते रामदास आठवले यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर पलटवार केलाय.. राज यांनी केलेल्या महाराष्ट्राचा लालू या टीकेवर मी त्यांना काँग्रेसचा भालू म्हणणार नाही असा उपरोधिक टोला आठवलेंनी लगावलाय.. तसंच राज ठाकरेंना महायुतीत नको असं त्यांनी पुन्हा स्पष्ट केलंय..

रामदास आठवलेंच्या कविता आणि किस्सा लाल गाडीचा

Last Updated: Tuesday, January 7, 2014, 15:03

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचं औचित्य साधत रिपाईच्या महिला विभागानं सोमवारी वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व दाखविलेल्या महिलांचा पुरस्कार देऊन गौरव केला.

मी महायुतीतच राहणार- आठवले

Last Updated: Tuesday, April 3, 2012, 21:23

राज्यसभा उमेदवारी नाकारल्यानंतर, नाराज असलेले रामदास आठवले सध्यातरी महायुतीतच राहणार आहेत. लोणावळ्यात आरपीआयच्या अधिवेशनात त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली आहे.

आठवलेंच्या पत्रकार परिषदेत हाणामारी

Last Updated: Monday, April 2, 2012, 18:28

आरपीआयचे नेते रामदास आठवलेंची पत्रकार परिषद सुरु होण्याआधी आज हाणामारी झाली. काही अज्ञात लोकांनी बाहेर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरें विरोधात घोषणाबाजी केल्यानं वातावरण तापलं.

शिवसेना-भाजपने विश्वासघात केला - आठवले

Last Updated: Monday, March 19, 2012, 14:42

शिवसेना, भाजप या दोन्ही पक्षांनी विश्वासघात केल्याचं रामदास आठवलेंनी म्हंटलं आहे. राज्यसभेच्या उमेदवारीविषयी रामदास आठवले यांच्याशी चर्चा केली नसल्याने शिवसेना आणि भाजप यांच्याविरोधात रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली.

राज ठाकरे 'किंगमेकर' नव्हे 'किंगफिशर' - आठवले

Last Updated: Thursday, February 23, 2012, 17:28

नाशिकमध्ये राज ठाकरे किंगमेकर नव्हे तर किंगफिशर ठरतील, असा टोला आरपीआय नेते रामदास आठवलेंनी लगावला आहे. आरपीआयचे चार नगरसेवक असून राष्ट्रवादीसह शिवसेना-भाजपनं पाठिंबा दिल्यास पक्षाचा महापौर बनेल असा विश्वास त्यांनी पंढरपूरमधल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला.