हिंसक `भारत बंद`... नेत्याची हत्या

Last Updated: Wednesday, February 20, 2013, 14:39

‘भारत बंद’ आंदोलनानं पहिल्याच दिवशी हिंसक वळण घेतलंय. दोन दिवसांच्या या आंदोलनात आज दिल्लीनजीकच्या अंबाला भागात एका ट्रेड युनियन नेत्याची भरदिवसा डेपोमध्येच हत्या झालीय.

कामगार संघटनांचा 'भारत बंद'; मुंबई सुरूच!

Last Updated: Wednesday, February 20, 2013, 08:16

कामगार संघटनांनी आजपासून दोन दिवसांचा देशव्यापी संप पुकारलाय. परंतू, बेस्ट बस, एसटी, रिक्षा, टॅक्सी सेवा सुरू राहणार आहेत तसंच अत्यावश्यक सेवांवरही परिणाम होणार नाही. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळालाय.

गोपीनाथ मुंडे, विनोद तावडे पोलिसांच्या ताब्यात

Last Updated: Thursday, September 20, 2012, 13:45

मुंबईत भाजप नेते गोपीनाथ मुंडे, विनोद तावडे, जयवंतीबेन मेहता, शायना एन. सी, अतुल शहा यांना पोलिसांनी अटक केली. मंत्रालय बंद पाडण्यास गेलेल्या भाजपच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

भाजप विरुद्ध भाजप

Last Updated: Wednesday, September 19, 2012, 22:43

उद्याच्या भारत बंदमध्ये पुण्यात भाजप सहभागी होणार नाही.. गणेशोत्सव आणि पर्युषण पर्वमुळं बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय भाजपनं घेतलाय.. डिझेल दरवाढ आणि एफडीआयविरोधात एनडीएनं भारत बंदची हाक दिलीय.. मात्र पुण्यात गणेशोत्सवाचा उत्साह आणि पर्युषण पर्वमुळं बंदमध्ये भाजप सहभागी होणार नसल्याचं शहराध्यक्ष विकास मठकरी यांनी सांगितलंय.. तसंच पुण्यातल्या नागरिकांनी ऐच्छिक बंद पाळावा असं त्यांनी म्हटलंय

'खळ्ळ् खटॅक'ला राज ठाकरेंचा विरोध

Last Updated: Thursday, May 31, 2012, 20:45

पेट्रोल दरवाढी विरोधात आपल्याकडे बंद होतो मात्र वाघ मृत्यू पाडत आहेत त्यासाठी बंद होत नसल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. वाघ शिकार पाहणी दौ-यातून कोणताही राजकीय लाभ घ्यायचा नसून आस्था म्हणून इकडे आलो असल्याचे राज म्हणाले.

देशभरात पेट्रोल दरवाढीचा निषेध...

Last Updated: Thursday, May 31, 2012, 14:57

देशभरात पेट्रोल दरवाढीमुळे संताप उसळलाय. याच संतापामुळे एनडीएनं पुकारलेल्या आजच्या एका दिवसाच्या भारत बंदला भारतात काही ठिकाणी सौम्य तर काही ठिकाणी तीव्र प्रतिसाद पाहायला मिळतोय. पाहुयात, पेट्रोल दरवाढीवरून देशभरात कसा निषेध केला गेला केंद्र सरकारचा...

भारत बंद

Last Updated: Saturday, June 9, 2012, 13:35

पेट्रोल दरवाढीविरोधात आज पुकारलेल्या भारत बंदमुळे राज्यातल्या जनजीवनावर परिणाम रात्रीपासूनच जाणवू लागलाय. पुण्यात पीएमपीएलच्या चार बसेसवर काही अज्ञातांनी दगडफेक केली.

उद्या 'भारत बंद', पेट्रोल दरवाढीचा निषेध

Last Updated: Wednesday, May 30, 2012, 13:48

पेट्रोल दरवाढीचा भडका देशभर उडाला आहे. उद्या NDAनं भारत बंदची हाक दिली आहे. तर CNGच्या मुद्यावर दिल्लीत रिक्षाचालकांनी संपाचा इशारा दिला आहे. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्या तेलाच्या किंमती घटल्यानं पेट्रोल १.६७ पैशांनी कमी होण्याचे संकेत HPCL नं दिले.

आज भारत बंद....

Last Updated: Thursday, December 1, 2011, 05:52

रिटेल क्षेत्रात परकीय गुंतवणुकीला मान्यता देण्याच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी आज भारत बंदचं आवाहन केलं. व्यापाऱ्यांच्या हिताचा नसलेला हा निर्णय मागे घेण्याची मागणी केंद्र सरकारला करण्यात आली.