केंद्र सरकारकडून सातव्या वेतन आयोगाची घोषणा

Last Updated: Wednesday, September 25, 2013, 13:28

केंद्र सरकारनं सातव्या वेतन आयोगाची घोषणा केलीय. पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी आज केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सातव्या वेतन आयोगाची घोषणा केली.

दुष्काळासाठी केंद्राची १२०७ कोटीची मदत जाहीर

Last Updated: Wednesday, March 13, 2013, 11:15

राज्यातल्या दुष्काळाग्रस्तांसाठी १२०७ कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिल्लीत या पॅकेजची घोषणा केली.

'आयटीबीपी'ला द्यायचे २१ कोटी केंद्राकडून माफ!

Last Updated: Saturday, January 5, 2013, 16:20

अतिरेकी अजमल कसाबच्या सुरक्षेसाठी ‘इंडो-तिबेट बॉर्डर’ पोलिसांना द्यावयाचे २१ कोटी रुपये केंद्रानं माफ केलेत. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी ही घोषणा केलीय.

गेमचेंजर... कॅश सबसिडी योजना

Last Updated: Wednesday, November 28, 2012, 09:41

केंद्र सरकरानं कॅश सबसिडी योजना लागू करण्याची घोषणा केलीय. या क्रांतीकारी योजनेमुळं आता थेट लाभार्थींच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा होणार आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांना भत्तावाढीची खूशखबर!

Last Updated: Friday, September 21, 2012, 09:29

वाढत्या महागाईला तोंड देण्यासाठी सरकारनं केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.

हल्ल्यानंतर केंद्राने तुणतुणे वाजवू नये- आबा

Last Updated: Thursday, March 29, 2012, 17:49

गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचे खापर केंद्र सरकारवर फोडलंय. विधिमंडळात नक्षलवादावरील चर्चेला उत्तर देताना गृहमंत्र्यांनी केंद्र सरकारला टार्गेट केलं.

नदीजोड प्रकल्प पूर्ण करा - सर्वोच्च न्यायालय

Last Updated: Tuesday, February 28, 2012, 09:25

गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेल्या देशातील नद्या जोडण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची योजना लवकरात लवकर पूर्ण करा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिला आहे. त्यामुळे याबाबत केंद्राला निर्णय घ्यावा लागणार आहे. दरम्यान, या निर्णयाचे स्वागत प्रकल्पाचे माजी प्रमुख सुरेश प्रभू यांनी केले आहे.

१५ दिवस पेट्रोल दरवाढ टळली!

Last Updated: Monday, January 2, 2012, 21:31

पेट्रोलियम कंपन्यांनी देशवासियांना नव वर्षाची भेट देत पेट्रोलच्या किमतीत अजिबात वाढ न करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला आहे. ही दरवाढ पुढील १५ दिवस होणार नाही. त्यामुळे सामान्यांना दिलासा आहे. पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांवर डोळा ठेवून केंद्र सरकारनंच या दरवाढीला तूर्तास लगाम लावला असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

लोकपाल संसदेत ‘सादर’, नाही झाला ‘आदर’

Last Updated: Thursday, December 22, 2011, 20:49

बहुप्रतिक्षित लोकपाल बिल आज अखेर संसदेत मांडण्यात आलं. पीएमओ मंत्री नारायण सामी यांनी हे ऐतिहासिक बिल लोकसभेत सादर केलं. मात्र लोकपाल संसदेतही विरोधाच्या गर्तेत असल्याचं लगेचच स्पष्ट झालं. लोकपालच्या अनेक मुद्द्यांना आक्षेप घेत, भाजप, सपा, राजद, शिवसेना आणि भाकपनं या बिलाला वेगवेगळ्या मुद्द्यांवर विरोध दर्शवला.

चांडाळ चौकडीचा डाव, अण्णांचा केंद्रावर घाव

Last Updated: Tuesday, October 25, 2011, 09:28

'टीम अण्णा'वर होणाऱ्या हल्ल्यास केंद्र सरकारमध्ये मंत्री असलेली 'चांडाळ चौकडी' जबाबदार असल्याचा घणाघाती घाव ज्येष्‍ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून केले आहे.