काश्मीरमध्ये तब्बल ४० दहशतवादी घुसलेत

Last Updated: Thursday, October 3, 2013, 14:16

काश्मीरच्या केरन सेक्टरमध्ये एका गावात तब्बल ४० दहशतवादी घुसलेत.त्यांच्याशी आर्मीचा गेल्या १० दिवसांपासून संघर्ष सुरू आहे. दहशतवादी आणि आर्मी यांच्यात जोरदार गोळीबार सुरू आहे. आज चकमकीचा दहावा दिवस आहे.

श्रीनगरमध्ये लष्कराच्या ताफ्यावर अतिरेकी हल्ला, एक जखमी

Last Updated: Saturday, September 28, 2013, 15:03

श्रीनगरच्या संतनगरमध्ये गोळीबार करण्यात आला आहे. हा हल्ला लष्कराच्या ताफ्यावर करण्यात आला आहे. या गोळीबारात एकजण जखमी झाला आहे. संपूर्ण परिसराला सैन्याने घातला वेढा असून अतिरेकी लपल्याची शक्यता वर्तविण्यात आला आहे.

विरोध धुडकावत काश्मीरमध्ये निनादले संगीताचे सूर!

Last Updated: Saturday, September 7, 2013, 19:51

हुरीयतच्या धमकीला भीक न घालता भारतीय वंशाचे जगप्रसिद्ध संगीतकार जुबिन मेहता आज (शनिवारी) काश्मीर खोऱ्यात आपल्या संगीताच्या माध्यमातून शांतीचं आवाहन करणार आहेत.

काश्मिरी भारतीय नाहीत का? - ओमर अब्दुल्ला

Last Updated: Friday, August 16, 2013, 09:47

काश्मिरी नागरिकांकडे ते जणू भारतीय नाहीतच याच नजरेने पाहिले जाते. त्यांना देशाच्या नागरिकांपेक्षा वेगळीच वागणूक दिली जात आहे, असा अजब दावा करत जम्मू-कश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी जम्मू-काश्मीरवर अन्याय होत असल्याचा आरोपच केला.

सुरक्षा गार्ड एटीएम मशीन फोडतो तेव्हा...

Last Updated: Thursday, July 18, 2013, 11:35

कुंपनाचे शेत खात तर असेल तर करायचं काय? अशी म्हण प्रचलित आहे. हीच बाब भारतीय स्टेट बॅंकेच्याबाबतीत घडलेय. या बॅंकेच्या एटीएम मशीनसाठी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आला होता. याच सुरक्षा रक्षकाने एटीएम मशीन तोडून २३ लाखांवर डल्ला मारला.

दहशतवादी हल्ल्यानंतरही पंतप्रधान-सोनिया काश्मीर दौऱ्यावर

Last Updated: Tuesday, June 25, 2013, 10:31

पंतप्रधान मनमोहन सिंह आणि सोनिया गांधी आज जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. श्रीनगरमध्ये हिजबुल मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांनी काल केलेल्या हल्ल्यात आठ जवान शहीद झाले होते.

श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला, ४ जवान शहीद

Last Updated: Monday, June 24, 2013, 18:14

श्रीनगरच्या हैदरपुरा भागात लष्कराच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची वृत्त आहे. दहशतवाद्यांच्या या हल्ल्यात चार जवान शहीद तर सात जवान जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. हिजबुल मुज्जाहिद्दीन यांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

दहशतवादी पाकिस्तानी असल्याचा संशय- सुशीलकुमार

Last Updated: Thursday, March 14, 2013, 13:47

दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या पाच जवानांना श्रद्धांजलीवेळी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे गैरहजर असल्यामुळं विरोधकांनी सभागृहात जोरदार गोंधळ घातला.

श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला; ५ जवान शहीद

Last Updated: Wednesday, March 13, 2013, 13:01

श्रीनगरमध्ये दहशदवाद्यांनी हल्ला केला आहे. बिमना परिसरातल्या शाळेबाहेर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे पाच जवान शहीद झाले आहेत.

उत्तरकाशीमध्ये ढगफुटी, २६ जणांचा मृत्यू

Last Updated: Saturday, August 4, 2012, 16:56

बातमी निसर्गाच्या कहराची.... उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये ढगफुटी झालीय. या दुर्घटनेत आतापर्यंत सव्वीस जणांचा मृत्यू झालाय. त्यामध्ये तीन पोलिसांचाही समावेश आहे. तर अजून शंभर जण बेपत्ता आहेत.

काश्मीरमध्ये 'तुफान' तडाखा

Last Updated: Tuesday, March 20, 2012, 15:58

जम्मू आणि काश्‍मीरमध्ये आलेल्या वादळाने जोरदार तडाखा दिला आहे. या वादळामुळे मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली आहे. हजारो घरांचे नुकसान झाले आहे. या वादळाचा एक बळी गेला असून दोघे जण बेपत्ता आहेत. तसेच हिमकडा कोसल्याने पाच जण फसल्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे. खोऱ्यात वादळ कायम असल्याने शाळांना सुटी जाहीर कऱण्यात आली आहे.