देशात फाटाफुटीचे लोण, आसामात हिंसाचार

Last Updated: Saturday, August 3, 2013, 10:13

आंध्र प्रदेशपासून तेलंगणा अलग करण्याचा निर्णय झाला खरा, पण देशात आता फाटाफुटीचे लोण पसरले आहे. महाराष्ट्र तोडण्याची भाषा केली गेलेय. वेगळा विदर्भानंतर मुंबईचे वेगळे राज्य. ईशान्य भारतात वेगळ्या बोडो राज्यासाठी हिंसाचार उफाळला. त्याचा फटका आसामसह पश्चिम बंगालला बसला आहे.

आसाम हिंसा : आमदार अटकेत, पुन्हा कर्फ्यु लागू

Last Updated: Thursday, August 23, 2012, 11:16

आसाम राज्यात नुकत्याच उफाळलेल्या हिंसाचाराबद्दल राज्यातील सत्तारुढ काँग्रेसचा सहयोगी पक्ष असलेल्या ‘बोडोलँड पीपल्स फ्रंट’ या पक्षाच्या एका आमदाराला अटक करण्यात आलीय.

आत्तापर्यंतचं सर्वात मोठं देशांतर्गत स्थलांतर!

Last Updated: Monday, August 20, 2012, 15:24

आसाम हिंसाचारानंतर देशभरातलं सर्वात मोठं स्थलांतर घडून आलयं. गेल्या काही दिवसांत जवळपास पाच लाख ईशान्य भारतीय नागरिकांनी आपल्या घरची वाट धरली आहे.

आसाम हिंसाचार : बांगलादेशी घुसखोर मुख्य कारण

Last Updated: Saturday, August 18, 2012, 16:11

आसामसह ईशान्य राज्यांमधील विद्यार्थ्यांवरील हल्ल्याचा मुद्दा संसदेत १८ ऑगस्टला गाजला. दोन्ही सभागृहांनी प्रश्नो्त्तराचा तास स्थगित करून या विषयावर केलेल्या चर्चेअंती, ईशान्येकडील राज्यांतील विद्यार्थ्यांना अफवांच्या माध्यमातून घाबरविणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा दिला.

संसदेत उमटले आसाम हिंसाचाराचे पडसाद

Last Updated: Friday, August 17, 2012, 16:44

ईशान्येकडील भारतीय नागरिकांच्या स्थलांतराच्या मुद्याचे आज संसदेतही प़डसाद उमटले. स्थलांतर रोखण्यासाठी सरकारनं ठोस कारवाई करण्याची मागणी सुषमा स्वराज यांनी केली. देशातल्या अनेक शहरांमध्ये शिकत असलेल्या विद्यर्थ्यांना सरकारनं सुरक्षेची हमी द्यावी तसंच त्यांच्यासाठी ठिकाठिकाणी हेल्पलाईनही सुरू करावी अशी मागणी स्वराज यांनी केली.

आसाममध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला

Last Updated: Friday, August 17, 2012, 10:03

आसाममध्ये गुरुवारी पुन्हा एकदा हिंसाचार उफाळून आला आहे. ताजी घटना ही बक्शा जिल्ह्यातील आहे. येथे बलवाई आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत अनेकजण जखमी झाले आहेत.

मतांसाठी घुसखोरीला उत्तेजन – अडवाणी

Last Updated: Thursday, August 9, 2012, 01:26

‘आसाममधला वाद हिंदू-मुस्लिमचा असा जातीयवादी नाही तर आसाममध्ये घुसखोरीमुळेच हिंसाचार सुरु आहे. आणि मतांसाठी या घुसखोरीला उत्तेजन मिळत असल्याचा’ घणाघाती आरोप अडवाणींनी सरकारवर केलाय. संसदेचं पावसाळी अधिवेशनात ते बोलत होते. अडवाणींच्या या आरोपांमुळे सोनिया गांधी मात्र चांगल्याच तापल्या.

आजपासून संसदेचं मान्सून अधिवेशन

Last Updated: Wednesday, August 8, 2012, 22:31

राजधानीत संसदेच्या मान्सून अधिवेशनाला आजपासून सुरुवात होतेय. आसाम हिंसेचा प्रश्न आपण पहिल्याच दिवशी दोन्ही सभागृहात उठवणार असल्याचं भाजपानं आधीच स्पष्ट केलंय. आसाम हिंसेच्या प्रश्नावर भाजपाकडून स्थगन प्रस्तावाची मागणीदेखील करण्यात येणार असल्याचं समजतंय. चिंदबरम यांच्यासोबतच महागाई, आर्थिक संकट आणि दुष्काळ यांसारख्या प्रश्नांवरही सरकारला घेरण्याचा चंग विरोधकांनी बांधलाय.