कल्पना गिरी हत्याप्रकरणाचा तपास आता CID कडे

Last Updated: Saturday, May 10, 2014, 15:52

लातूरमधील काँग्रेस कार्यकर्त्या कल्पना गिरी हत्या प्रकरणाचा तपास आता सीआयडीकडे देण्यात आलाय. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आलाय. पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांनी त्यासंदर्भात आदेश दिलाय. पोलीस महालसंचालकांनी तशी माहिती लातूर पोलिसांना दिली आहे.

मतदारांना पैसे वाटणाऱ्या शेकाप कार्यकर्त्याला अटक

Last Updated: Friday, April 18, 2014, 11:57

मावळ मतदार सघांत येणाऱ्या उरण तालुक्यात मतदानासाठी पेसे वाटप करणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाचे पक्षाचे कार्यकर्ते महादेव घरत यांना अटक करण्यात आलीय.

औरंगाबादमध्ये मनसे कार्यकर्त्यांचा कोणता झेंडा घेऊ हाती?

Last Updated: Tuesday, April 8, 2014, 19:48

औरंगाबादमधील प्रचार आता शिगेला पोहचलाय. सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते जोमात कामाला लागलेत. मात्र मनसे कार्यकर्ते मात्र या सगळ्यापासून दूर आहेत. अजूनही कोणता झेंडा घेऊ हाती असा प्रश्न या कार्यकर्त्यांना पडलाय.

जुन्नरमध्ये RTI कार्यकर्त्याचा संशयास्पद मृत्यू

Last Updated: Tuesday, March 25, 2014, 12:44

जुन्नरमध्ये एका आरटीआय कार्यकर्त्याचा संशयास्पद मृत्यू झालाय. विलास बारावकर असं आरटीआय कार्यकर्त्याचं नाव आहे. ते चाकणमधील रहिवासी होते. चाकणच्या राजगुरू परिसरातल्या सहकारी संस्थांचे घोटाळे त्यांनी उघडकीस आणले होते. मात्र ही आत्महत्या आहे की हत्या याबाबत अस्पष्टता आहे.

केजरीवालांकडून जिवंत आरटीआय कार्यकर्त्यांना श्रद्धांजली

Last Updated: Monday, March 10, 2014, 17:34

आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी चुकून ३ जिवंत आरटीआय कार्यकर्त्यांना श्रद्धांजली दिली आहे. या मुद्यावरून सोशल मीडियावर विरोधकांनी केजरीवाल यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे.

‘आप’चा पाठिंबा मागे घेऊ शकते काँग्रेस ?

Last Updated: Tuesday, December 24, 2013, 20:24

दिल्लीमध्ये आम आदमी पक्ष २६ डिसेंबर म्हणजे उद्या सरकार बनवत आहे. दुसरीकडे ‘आप’ला बाहेरून पाठिंबा देणारा काँग्रस पक्ष पाठिंबा काढून घेण्याच्या तयारी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मोदींचं ढोल-ताशांनी स्वागत करणं पडलं महागात!

Last Updated: Tuesday, October 1, 2013, 15:07

गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी याचं स्वागत करणं भाजप कार्यकर्त्यांना महागात पडलंय. सायलेन्स झोनमध्ये आवाज केला म्हणून मुंबई भाजपवर कारवाई करत मुंबई पोलिसांनी त्यांना पाच हजार रूपयांचा दंड ठोठावलाय.

पुण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांना कांद्याची ‘मेजवानी’!

Last Updated: Wednesday, September 25, 2013, 14:44

पुण्यात सुरू असलेल्या राहुल गांधींच्या बैठकीत कांद्याचा सुकाळ पहायला मिळतोय. कार्यकर्त्यांना कांद्याची मेजवानी देण्यात येतेय. एकीकडे ७० ते ८० रुपयांच्या घरात गेलेला कांदा सर्वसामान्यांच्या डोळ्यातून पाणी काढतोय. काँग्रेससाठी मात्र कांद्याचा महापूर वाहतोय, असंच पुण्यातल्या या मेजवानीवरून दिसतंय.

यमदूत बिल्डर शेख - कुरेशी अद्यापही फरार!

Last Updated: Saturday, April 6, 2013, 07:05

ठाणे इमारत दुर्घटनेला जबाबदार असलेल्या बिल्डर सलीम शेखला अटक करण्यात पोलिसांना आणि क्राईम ब्रान्चला यश आलाय. अनधिकृत आणि कमकुवत बांधकाम करणाऱ्या सलीम शेखची अटक ही या प्रकरणातील पहिलीच अटक आहे..

मलालाची प्रकृती स्थिर; तालिबान्यांवर पुन्हा मात

Last Updated: Wednesday, October 24, 2012, 19:03

पाकिस्तानची युवा कार्यकर्ता मलाला युसूफजई हिची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती ब्रिटनच्या हॉस्पीटलमधील डॉक्टरांकडून देण्यात आलीय.