खूशखबर... त्र्यंबकेश्वराचं पेड दर्शन बंद होणार!

Last Updated: Monday, April 7, 2014, 21:27

त्र्यंबकेश्वरमध्ये आता महादेवाच्या दारात गरीब श्रीमंत हा भेदभाव लवकरच बंद होणार अशी चिन्हं आहेत. भाविकांचं धावपळीचं जीवनमान एनकॅश करत मंदिर ट्रस्टनं पेड दर्शन सुरू केलं होतं, पण आता हे पेड दर्शन ताबडतोब बंद करावं, अशी नोटीस पुरातत्व विभागानं बजावलीय.

त्र्यंबकेश्वर पालिका नगराध्यक्ष निवडणुकीत मनसेची बाजी

Last Updated: Tuesday, January 21, 2014, 14:42

नाशिकमधील त्र्यंबकेश्वर महानगरपालिकेत नगराध्यक्ष निवडणुकीत मनसे बाजी मारत आपली सत्ता राखली आहे. सर्वाधिक सहा जागा मिळविलेल्या मनसेची पालिकेत सत्ता आहे. नगराध्यक्ष निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. या निवडणुकीत मनसे उमेदवार यशोदा अडसरे यांनी बाजी मारली.

त्र्यंबकेश्वरला घडणार उत्तराखंडाची पुनरावृत्ती?

Last Updated: Wednesday, June 26, 2013, 21:31

उत्तराखंडात जसा हिमालय आणि त्याच्या पायांवरुन वाहणारी गंगा, तसंच महाराष्ट्रातलं त्र्यंबकेश्वरमधील ब्रह्मगिरी आणि तिथूनच उगम होणारी गोदामाई. ही दोन चित्रं ठळकपणे दाखवण्याचं कारण म्हणजे जे उत्तराखंडात घडलं ते त्र्यंबकेश्वरातही घडू शकतं.

त्र्यंबकेश्वर गजबजलं निवृत्तीनाथांच्या यात्रेने

Last Updated: Wednesday, February 6, 2013, 22:07

पवित्र नगरी त्र्यंबकेश्वर निवृत्तीनाथांच्या यात्रेमुळे गजबजून गेलंय. गावोगावच्या दिंड्या त्र्यंबकेश्वरात दाखल झाल्या आहेत. या सोहळ्याला किमान पाच लाख भाविक हजेरी लावण्याचा अंदाज आहे.

'ब्रह्मगिरी'चं अस्तित्व धोक्यात!

Last Updated: Friday, June 22, 2012, 09:03

लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या ब्रह्मगिरीवर आता चार ते पाच मजली बांधकामं सुरु झाली आहेत. पर्यावरणाच्या नियमांना हरताळ फासत हा प्रकार सुरू झालाय, हे तर उघडउघड सत्य आहे. धक्कादायक बाब म्हणजे राजकारणीही ब्रह्मगिरीवर कब्जा करण्याच्या स्पर्धेत आहेत.

त्र्यंबकेश्वरमध्ये पर्यटक महिलेवर बलात्कार

Last Updated: Sunday, March 18, 2012, 12:26

नाशिकमधील गुन्हेगारीचे पेव आता तीर्थस्थळ त्र्यंबकेश्वरपर्यंत पोहचू लागलेत. त्र्यंबकेश्वरमध्ये एका पर्यटक महिलेवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पाच स्थानिक तरूणांना अटक करण्यात आली आहे.