फोन खणखणला, हर्षदा महिलेजवळ पिशवीत बॉम्ब...

Last Updated: Tuesday, May 20, 2014, 16:45

रोहा - दिवा पॅसेंजरमध्ये हर्षदा म्हात्रे नावाची महिला पिशवीत बॉम्ब घेऊन प्रवास करीत आहे, असा निनावी फोन आला. हा फोन रोहा पोलीस ठाण्यात खणखणला. त्यानंतर पोलिसांनी वेगाने सूत्रे हलविलीत. मात्र, ही अफवाच असल्याचे तपासानंतर पोलिसांनी स्पष्ट केले.

रोहा-दिवा पॅसेंजरमध्ये बॉम्बची अफवा

Last Updated: Tuesday, May 20, 2014, 14:06

दिवा पॅसेंजर गाडीत बॉम्ब असल्याची अफवा पसरल्याने रोहा-दिवा गाडी रोहा येथे थांबविण्यात आली. बॉम्बच्या अफवेने सुरक्षा यंत्रणेची तारांबळ उडाली. तर रोहा येथे गाडी थांबवून ठेवण्यात अाल्याने भीतीचे वातावरण होते. दरम्यान, अलिबागहून बॉम्बशोधक पथक रोहा येथे दाखल झाल्यानंतर शोध घेतल्यानंतर बॉम्बची अफवा असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर अडीच तासानंतर गाडी सोडण्यात आली.

कोकण रेल्वे अपघात, मृतांची आणि जखमींची नावं

Last Updated: Sunday, May 4, 2014, 22:39

गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी रेल्वे अपघात झाला त्या ठिकाणाला भेट दिलीय. अपघातग्रस्तांना राज्य सरकारकडून योग्य प्रकारची मदत केली जाईल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं.

रूळ तुटल्याने दिवा-सावंतवाडी पॅसेंजर घसरली?

Last Updated: Sunday, May 4, 2014, 14:48

दिवा-सावंतवाडी पॅसेंजर अपघात रेल्वे रूळ तुटल्याने झाला असावा, असं रायगड पोलिसांनी म्हटलं आहे. या अपघातात 15 जण ठार झाले आहेत, तर 96 जण जखमी आहेत.

दिवा-सावंतवाडी पॅसेंजर अपघात, मृतांची संख्या वाढली

Last Updated: Sunday, May 4, 2014, 17:03

दिवा-सावंवाडी पॅसेंजरला झालेल्या अपघातातील मृतांचा आकडा वाढला आहे. मृतांचा आकडा 12 वर गेल्याचं सांगण्यात येतंय.

दिवा-सावंतवाडी पॅसेंजरला भीषण अपघात

Last Updated: Sunday, May 4, 2014, 14:48

रायगड जिल्ह्यात दिवा-रोहा पॅसेंजरला भीषण अपघात झाला आहे. यात आतापर्यंत चार जण ठार झाले असल्याचं सांगण्यात येतंय.

गुलबर्गा-सोलापूर पॅसेंजरला भीषण आग; दोघांचा बळी

Last Updated: Tuesday, October 16, 2012, 16:31

कर्नाटकच्या गुलबर्गा स्टेशनवरच आज सोलापूर-गुलबर्गा पॅसेंजरच्या एका डब्याला भीषण आग लागली. या आगीत दोन जण जळून ठार झाले आहेत तर आणखी सात जण जखमी असल्याचं समजतंय.

नगरसोल-नांदेड पॅसेंजरला अपघात, १०० जखमी

Last Updated: Thursday, May 24, 2012, 17:51

परभणी जिल्ह्यातल्या सातोना-उस्मापूर स्टेशनवर उभ्या असलेल्या नगरसोल-नांदेड पॅसेंजरला अपघात झाला आहे. पॅसेंजरला एका इंजिननं धडक दिल्यानं १०० प्रवासी जखमी झाले आहेत.