रिक्षाचालकांचा संप, नागरिकांना कंप

Last Updated: Monday, April 16, 2012, 16:21

रिक्षा भाडेवाढीसाठी ऑटो रिक्षा मेन्स युनियननं पुकारलेल्या बंदमुळे नवी मुंबईतल्या प्रवाशांचे हाल होत आहेत. रिक्षाचालकांच्या बेमुदत संपावरुन शरद रावांनी माघार घेत आज लाक्षणिक संप पुकारला आहे.

रिक्षाचालकांचा आज लाक्षणिक संप

Last Updated: Monday, April 16, 2012, 16:03

रिक्षाचालकांच्या बेमुदत संपावरुन शरद रावांनी माघार घेत आज लाक्षणिक संप पुकारला आहे. सीएनजीपाठोपाठ पेट्रोल रिक्षाच्या दरातही वाढ करण्यात यावी, अशी मागणी ऑटोरिक्षा मालक-चालक संघटना कृती समितीनं केली आहे.

रिक्षाचालकांचा संप.... होणारच....

Last Updated: Sunday, April 15, 2012, 13:26

आज मध्यरात्रीपासून मुंबईकरांना एका त्रासाला सामोरं जावं लागणार आहे. राज्य सरकारनं मुंबईतल्या रिक्षाच्या किमान भाड्यात केलेली एक रुपयाची वाढ समाधानकारक न वाटल्यामुळे ऑटोरिक्षा मालक चालक संघटना कृती समितीनं नाराजी व्यक्त केली आहे.

रिक्षांना इलेक्ट्रॉनिक मीटर अनिवार्य

Last Updated: Friday, April 13, 2012, 19:44

रिक्षांना इलेक्ट्रनिक मीटर बसवावेच लागतील, या निर्णयावर आज सुप्रीम कोर्टानंही शिक्कामोर्तब केलय. याबाबत रिक्षाचालक संघटनांनी केलेली याचिका युप्रीम कोर्टानं फेटाळून लावलीय. तसंच मुंबई हायकोर्टानं दिलेल्या निर्णयावरही कोर्टानं शिक्कामोर्तब केलंय.

रिक्षाचालकांचा पुन्हा संपाचा इशारा

Last Updated: Wednesday, April 4, 2012, 18:05

इलेक्ट्रॉनिक मीटर सक्तीविरोधात १६ एप्रिलपासून राज्यभरातील रिक्षाचालक संपावर जातील,असा इशारा संघटनेतर्फे देण्यात आला आहे. भाडेवाढ करण्याची रिक्षा संघटनांची मागणी आहे.

रिक्षाचालकांचा संप अटळ- शरद राव

Last Updated: Monday, March 12, 2012, 22:40

राज्यभरातील रिक्षा चालकांनी १५ एप्रिलनंतर बेमुदत संपाचा इशारा दिला आहे. रिक्षा संघटनांच्या कृती समितीची आज पुण्यात बैठक झाली. त्यात राज्य सरकारकडं १८ मागण्या मांडण्यात आल्या.