‘पाऊस पडू द्या, मग पेरणीचं पाहू`

Last Updated: Tuesday, May 21, 2013, 09:18

दुष्काळामुळं पाण्याचे दुर्भिक्ष आणि पावसाच्य़ा बेभरवशीपणामुळं यंदा खानदेशातल्य़ा कापूस पट्ट्यात मान्सूनपूर्व पेरण्याच झालेल्या नाहीत.

ऊस लागवडीचा अभिनव प्रयोग

Last Updated: Tuesday, August 28, 2012, 11:17

पारंपरिक ऊस लागवडीच्या पद्धतीला फाटा देणारा एक अभिनव प्रयोग गोंदिया जिल्ह्यातील शेकऱ्यानं केलाय. या प्रयोगामुळे त्यांचं साधारण ७० ते ७५ टक्क्यांनी उसाच्या उत्पादनात वाढ होणार आहे.

अफू पिकाला मान्यता द्या- शेतकरी संघटना

Last Updated: Wednesday, February 29, 2012, 19:16

राज्यभरात फोफावलेल्या अफूच्या पिकामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या असताना आता अफू पिकाला मान्यता मिळावी म्हणून शेतकरी संघटना आंदोलनाचं रणशिंग फुंकणार आहे.

अफूच्या शेतीवरून पोलिसच संशयाच्या फेऱ्यात

Last Updated: Wednesday, February 29, 2012, 16:06

सांगलीतल्या अफूच्या शेती प्रकरणामुळं आता राजकीय नेत्यांनाही नशा चढू लागली आहे. अफूच्या शेतीवरुन वनमंत्री पतंगराव कदम यांनी गृहमंत्री आर आर पाटील यांच्यावर तोंडसुख घेतलंय. पोलिसांनी हप्ते घेणं थांबवलं तर काम चांगलं होईल, असा टोला पतंगरावांनी हाणला आहे.

राज्यात शेतीची नशा

Last Updated: Tuesday, June 5, 2012, 18:02

सुरेंद्र गांगण
बीड, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यात अफूची शेती फोफावत आहे. बीड जिल्ह्यात प्रथम अफूच्या शेतीची पाळेमुळे दिसून आली. मात्र, ही पाळेमुळे खोलवर रूजलेली होती. कृषी अधिकाऱ्यांना चक्क चुना लावून अन्य शेतीच्या नावाखाली अफूची पेरणी केली गेली. ही पेरणी बक्कळ पैसा मिळविण्यासाठीच झाल्याचे स्पष्ट होत आहे. झटपट श्रीमंत होण्यासाठी या शेतीची नशाच शेतकऱ्याला पडलेली दिसून येत आहे.

गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यात अफूची लागवड

Last Updated: Tuesday, February 28, 2012, 18:27

सांगली जिल्ह्यात म्हणजे गृहमंत्री आर आर पाटील यांच्या जिल्ह्यात अफूची लागवड होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शिराळा तालुक्यातील तीन एकर जमिनीवर अफूची लागवड केली जात असल्याचं उघड झाले आहे. तर कोल्हापुरातही अफुची लागवड करण्यात आल्याचं पुढे आले आहे.

अफूच्या शेतीच्या चौकशीचे आदेश

Last Updated: Saturday, February 25, 2012, 16:15

बीड जिल्ह्यातल्या अफूच्या शेतीप्रकरणात महसूल अधिका-यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. खोटी शेती दाखवून अफूची शेती का केली, याची चौकशीनंतर बाब उघड होणार असल्याने कृषी अधिकाऱ्यांचे दाबे दणाणले आहेत.

बीड जिल्ह्यात अफूची लागवड...

Last Updated: Friday, February 24, 2012, 11:00

बीड जिल्ह्यातील मोहा, शिरसाळासह चार-पाच गावात ३०० एकर क्षेत्रफळावर अफूची लागवड करण्यात आल्याचं उघडी झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.