पोलिसांची नाकाबंदी, मनसेचे १४ पदाधिकारी अटकेत

Last Updated: Wednesday, February 12, 2014, 09:11

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आज राज्यभरात होणा-या रास्ता रोकोच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मनसेच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची धडरपकड सुरु केलीय. तर मुंबई-कोल्हापूर बायपासवर चांदणी चौकात रास्तारोको केलाय. निफाड हायवेवर आंदोलन सुरू आहे. दरम्यान, नाशिक टोल नाक्यावर पोलिसांची नाकाबंदी करण्यात आलेय.

राज ठाकरेंना अटक, आरसीएफ पोलीस ठाण्यात राज

Last Updated: Wednesday, February 12, 2014, 16:13

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना चुनाभट्टीजवळ अटक करण्यात आल्यानंतर त्यांना आरसीएफ पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. दरम्यान, त्याचवेळी पत्नी शर्मिला ठाकरे यांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. तर कार्यकर्ते अधिक आक्रमक झाले आहेत.

सिग्नल यंत्रणेत बिघाड; रेल्वे खोळंबली

Last Updated: Saturday, April 13, 2013, 10:35

मध्य रेल्वेच्या मार्गावर आज सकाळी पुन्हा एकदा वाहतूकीचा खोळंबा झालाय. ठाणे स्टेशनजवळ सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीय.

हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत

Last Updated: Tuesday, March 5, 2013, 19:58

वडाळा ते जीटीबी दरम्यान हार्बर मार्गावर लोकलचा डबा रुळावरून घसरल्याने हार्बरची वाहतूक विस्कळीत झाली आहे. आज सायंकाळी चार वाजता ही घटना घडली.

सिग्नल यंत्रणेत बिघाड... मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

Last Updated: Friday, December 14, 2012, 17:36

मुलुंड स्टेशनजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीय. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक अर्ध्या तासानं उशीरा होत आहे.

पावसाचा दणका; एक बळी, वाहतूक विस्कळीत

Last Updated: Monday, June 18, 2012, 10:48

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. देवगडमध्ये पावसाच्या पाण्यात दहा वर्षाचा मुलगा वाहून गेलाय. तर मालवणमध्ये एका घरावर माड पडून एकजण जखमी झालाय. तर अनेक ठिकाणी झाडे कोसळून वीज पुरवठा खंडित झाला आहे. मुंबई आणि ठाण्यातही पाऊस चांगला झाला. तर पावसाचा परिणाम रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर झाला आहे. कल्याण बदलापूर हा हायवे ४ तास ठप्प होता. कोकण रेल्वे उशिराने धावत आहे.