मुलीच्या लग्नाआधीच शेतकऱ्यानं मृत्यूला कवटाळलं

Last Updated: Tuesday, March 11, 2014, 08:37

मराठवाडयात गारपीट लोकांच्या जीवावर उठलीय. आत्तापर्यंत गारपीटीनं २० पेक्षा जास्त बळी घेतलेत. २०० पेक्षा जास्त जनावरं मेलीत. या गारपीटीनं बसलेला मानसिक धक्काही जीवघेणा आहे. हाताशी आलेलं पीक गारपीटीनं नष्ट झालेलं पाहून वैजापूरच्या एका शेतकऱ्यानं पोरीच्या लग्नाच्या आधीच आत्महत्या करुन जीवन संपवल्यानं परिसरालाच धक्का बसलाय.

महापालिकेकडून काहीतरी शिका... टोल रद्द करा; शेवाळेंची मागणी

Last Updated: Wednesday, January 22, 2014, 12:37

मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्र्यांना टोलसंदर्भात पत्र लिहिलंय. `टोल रद्द करावा`, अशी मागणी शेवाळे यांनी पत्राद्वारे केलीय.

`विक्रांत`ला वाचवण्यासाठी बीएमसी सरसावली!

Last Updated: Tuesday, December 10, 2013, 13:10

देशाचा ऐतिहासिक वारसा असलेल्या आयएनएस `विक्रांत`ला वाचवण्यासाठी मुंबई महापालिका पुढं सरसावलीय. विक्रांतच्या संवर्धनासाठी आवश्यक निधी देणार असल्याचं महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी सांगितलंय.

राहुल शेवाळेंच्या उमेदवारीवर उद्धव ठाकरेंनी केलं शिक्कामोर्तब?

Last Updated: Sunday, September 29, 2013, 11:32

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केल्याचे संकेत मिळतायेत. शनिवारी रात्री उद्धव यांनी दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला.

मनोहर जोशींचा लोकसभेचा पत्ता कट?

Last Updated: Wednesday, September 25, 2013, 20:33

दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार म्हणून मनोहर जोशींचा पत्ता जवळपास कापल्यातच जमा आहे..

मनोहर जोशी नाराज, राहुल शेवाळे लोकसभेचे उमेदवार?

Last Updated: Tuesday, September 24, 2013, 11:44

दक्षिण मध्य मुंबईतून निवडणूक लढवण्याची इच्छा मनोहर जोशी यांनी व्यक्त केल्यानंतर त्यांनी त्यादृष्टीनं तयारी देखील सुरू केली होती. मात्र शिवसेना पक्षानं विश्वासात न घेता मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे राहुल शेवाळेंना उमेदवारीसाठी पक्षनेतृत्वानं हिरवा कंदील दिला असल्याची जोरदार चर्चा आहे.

राहुल शेवाळेंचं `राजीनामानाट्य`!

Last Updated: Wednesday, July 31, 2013, 09:35

खड्ड्यांची जबाबदारी स्वीकारत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे धाडून दिला. अर्थात अपेक्षप्रमाणे उद्धव ठाकरेंनी हा राजीनामा फेटाळलाय.

सरणाच्या लाकडांची होळी; पालिकेच्या प्रतिमेचा प्रश्न!

Last Updated: Tuesday, March 26, 2013, 21:03

‘महापालिकेतर्फे अंत्यविधीसाठी मोफत लाकडं उपलब्ध करून दिली जातात आणि अशा प्रकारे या अंत्यविधीसाठीच्या लाकडांमध्येही भ्रष्टाचार होत असेल तर संबंधितांवर नक्कीच कारवाई केली जाईल’ असं आश्वासन स्थायी समितीचे सभापती राहुल शेवाळे यांनी दिलंय.

कंत्राटदारांवर कारवाई पण... स्टँडिंग कमिटीत 'अंडरस्टँडिग'?

Last Updated: Thursday, February 7, 2013, 09:25

मुंबई महापालिकेच्या कामात कामचुकार करणाऱ्या सहा कंत्राटदारांना पालिकेनं ब्लॅक लिस्टेड केलंय. तसंच मलनि:सारण कामाची खोटी बीलं देणाऱ्या १७ कंत्राटदाराची चौकशी सुरू करून यातील पाच कंत्राटदारांना पालिकेनं ताबडतोब `काम बंद`चे आदेश दिलेत.

नगरसेवक होणार 'मालामाल'

Last Updated: Wednesday, August 1, 2012, 19:06

मुंबई महापालिकेचे नगरसेवक मालामाल होणार आहेत. प्रत्येक नगरसेवकाला आता महिन्याला २५ हजार रुपये मानधन म्हणून मिळणार आहेत. सोबतच लॅपटॉप आणि एण्ड्रॉइड फोनचीही सुविधा आता नगरसेवकांना महापालिकेकडूनच मिळणार आहे.

एमआरआय मशिन घोटाळा: कारवाई कधी?

Last Updated: Tuesday, June 19, 2012, 11:49

मुंबई महापालिकेत एमआरआय मशीन खरेदीत घोटाळयाची बातमी ‘झी 24 तास’वर दाखवल्यावर महापालिकेनं त्याची दखल घेतली आहे. महापालिकेनं 80 कोटीच्या नवीन वैद्यकीय साहित्याची MRP किंमत तपासूनच व्यवहार करावा, अशी सूचना स्थायी समिती अध्यक्षांनी केलीय.

मुंबईचे नवे महापौर सेनेचे सुनील प्रभू!

Last Updated: Monday, March 5, 2012, 15:34

मुंबईच्या महापौरपदासाठी सुनील प्रभू, स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी राहुल शेवाळे तर गटनेतेपदासाठी यशोधन फणसे यांची नावे जवळजवळ निश्चित झाल्याचं समजतं. या संदर्भात अधिकृत घोषणा झाली नाही.

मुंबईच्या महापौरपदी सुनील प्रभू?

Last Updated: Monday, March 5, 2012, 13:06

मुंबईच्या महापौरपदासाठी सुनील प्रभू, स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी सुरेंद्र बागलकर तर गटनेतेपदासाठी राहुल शेवाळे यांची नावे जवळजवळ निश्चित झाल्याचं समजतं.

पाहून मुंबईचा विकास, विरोधकांना होतोय त्रास

Last Updated: Saturday, October 22, 2011, 14:55

राहुल शेवाळे
महापालिकेतर्फे उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पाच्या उद्घाटनाची माहिती आयुक्तांना १५ दिवस अगोदर देण्याचा नियम काही नवा नाही. यापूर्वी अशा प्रकारे वेळोवेळी सूचना देण्यात आल्या आहेत.