भंडारा हत्याकांडाचे पडसाद राज्यसभेत, CBI चौकशी करा, Shinde reveals identities of Bhandara rape victims

भंडारा हत्याकांडाचे पडसाद राज्यसभेत, CBI चौकशी करा

भंडारा हत्याकांडाचे पडसाद राज्यसभेत, CBI चौकशी करा
www.24taas.com, नवी दिल्ली

भंडाऱ्यातल्या तिघा बहिणींवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणाचे पडसाद आज राज्यसभेतही उमटले. गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी याप्रकरणी निवेदन दिलं. मात्र, त्यांच्या निवेदनातून काहीही हाती लागलेलं नाही. केवळ तपास सुरू आहे. चौकशी सुरू आहे. अशीच टेप त्यांनी राज्यसभेत वाजवली. त्यानंतर झालेल्या चर्चेत सर्वच पक्षांच्या खासदारांनी सरकारला धारेवर धरलं. राष्ट्रवादीचे हुसेन दलवाई यांनी राज्यात आपल्या पक्षाकडे असलेल्या गृहमंत्रालयावर अविश्वास दाखवत सीबीआय चौकशीची मागणी केली. केवळ पीआयचे निलंबन पुरेसे नाही असं सांगत भाजपच्या स्मृती इराणी यांनी राज्यात दोन वर्षांपासून रिक्त असलेल्या महिला आयोग अध्यक्षपदावर प्रश्न उपस्थित केला. प्रकाश जावडेकर यांनीही सीबीआय चौकशीची मागणी केली.

महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्था बिघडली असल्यानं निलंबनाव्यतिरिक्त अन्य कारवाई होणार नाही आणि म्हणूनच या प्रकरणी सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी प्रकाश जावडेकर यांनी केलीय.

तर या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करत काँग्रेसचे प्रवक्ते आणि खासदार हुसेन दलवाई यांनी सरकारला घरचा अहेर दिलाय. भंडाऱ्यातील एसपींवरदेखील तात्काळ कारवाई केली जावी... त्यांना निलंबित करण्यात यावं, अशी मागणीही त्यांनी यावेळी केलीय.

First Published: Friday, March 1, 2013, 14:31


comments powered by Disqus