`एमआयडीसी` प्रकल्पातून जाधवांची जमीन कशी वाचली?`

Last Updated: Saturday, January 18, 2014, 18:41

निसर्गरम्य कोकण सध्या भकास करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न दिसतोय. कारण गुहागर-चिपळूण तालुक्याच्या मध्यावर्ती अर्थात मार्गताम्हाणे येथे येऊ घालेल्या एमआयाडीसी प्रकल्पाला गावकऱ्यांनी विरोध दर्शवायलाय.

मनसेचा एक निर्णय... आणि राज ठाकरेंच्या लोकप्रियतेत वाढ!

Last Updated: Sunday, November 24, 2013, 18:36

शासकीय प्रकल्पांचं भूमिपूजन आणि उद्घाटन सोहळे एखाद्या मोठ्या राजकीय नेत्याला बोलावून पार पाडण्याची प्रथा सध्या जोरावर आहे. पण, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याच वृत्तीवर आपला आक्षेप व्यक्त केलाय.

शिवतीर्थावर बाळासाहेबाचं स्मारक नको- स्थानिक रहिवासी

Last Updated: Tuesday, November 20, 2012, 15:10

शिवाजी पार्क मैदानात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारण्यावरुन आता वाद सुरु झालाय.. मात्र या शिवाजी पार्क मैदानाचा एक इतिहास आहे.

पुण्याचं पाणी विधानसभेतही पेटलं

Last Updated: Thursday, July 19, 2012, 08:54

पुण्याचं पाणी महाराष्ट्राच्या विधानसभेत पेटलंय. पुण्याचं पाणी दौंडला सोडण्याचा निर्णय झाल्यानंतर स्थानिक आमदारांनी अजित पवारांविरोधात रोष व्यक्त केला. खडकवासलामध्ये सध्या दोन टीएमसी पाणी आहे. त्यातलं अर्धा टीएमसी पाणी दौंडला सोडण्यात येणार आहे. या निर्णयाला राष्ट्रवादी वगळता सर्वच पक्षांचा विरोध आहे.

काँग्रेस- राष्ट्रवादीमध्ये आज प्रतिष्ठेची लढत

Last Updated: Friday, May 25, 2012, 08:53

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सहा जागांसाठी आज मतदान होतयं. काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं ही निवडणूक प्रतिष्ठेची केलीये. आघाडीतील दोन्ही पक्ष प्रत्येकी तीन तीन जागा लढवत आहेत. निवडणुकीत दोन्ही पक्षांना ऐकमेकांकडून दगाफटका होण्याची शक्यता वर्तवण्यात येतंय.

'कोंडाण्या'बरोबर नागरिकही राहिले कोरडेच!

Last Updated: Friday, May 18, 2012, 13:34

प्रकल्पाच्या मूळ किंमतीत भरमसाठ वाढ झाल्यानंतर कोंडाणे धरण प्रकल्प चौकशीच्या फेऱ्यात अडकलाय पण, त्यात स्थानिक मात्र नाहक भरडले जात आहेत.

निवडणुकीसाठी 'जोडी तुझी-माझी' !

Last Updated: Sunday, January 22, 2012, 09:07

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय शरद पवार यांच्या प्रेरणेतून झाल्याचा गवगवा राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच करते. पण त्यांच्याच पक्षातले स्थानिक नेते या निर्णयाचा उपयोग करत मनपा निवडणुकांचं तिकीट घरातच रहावं यासाठी कसे प्रयत्नशील आहेत.

राष्ट्रवादी-प्रकाश आंबेडकरांमध्ये महत्वपूर्ण बोलणी

Last Updated: Sunday, January 15, 2012, 12:29

राष्ट्रवादी काँग्रेसने दलित मतांची बेगमी करण्यासाठी व्युहरचना आखत भारिप बहुजन महासंघाच्या प्रकाश आंबेडकरांशी बोलणी सुरु केली आहेत.

स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी

Last Updated: Saturday, November 19, 2011, 16:43

राज्यात लवकरच 10 महापालिका, 27 जिल्हा परिषद, 309 पंचायत समित्या आणि 198 नगर परिषदांच्या निवडणुका होणार आहेत. त्यासंदर्भात विचार करण्यासाठी आयोजीत करण्यात आलेली काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक संपली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था एकत्र लढवणार. दोन्ही पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांची घोषणा. येत्या बुधवारी होणार औपचारिक घोषणा. भाजपा शिवसेना आणि रामदास आठवलेंची रिपाईने काँग्रेस आणि राष्ट्रवादी समोर कडवं आव्हान उभं केलं आहे. नुकत्याच झालेल्या खडकवासला पोटनिवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला पराभवाचा झटका बसला. खडकवासल्याची पोटनिवडणुक उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रतिष्ठेची केली होती. मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांच्या पत्नी हर्षदा वांजळे राष्ट्रवादीच्या उमेदवार होत्या. पण हर्षदा वांजळेंना भाजपाच्या भीमराव तापकीरांकडून पराभवाचा सामना करावा लागला. तसंच गेल्या काही दिवसात शेतकऱ्यांचे उस आणि कापसाला योग्य भाव मिळावा म्हणून सुरु झालेल्या आंदोलनाने तीव्र स्वरुप धारण केल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारची पाचावर धारण बसली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या खासदार राजू शेट्टींनी थेट पवारांच्या बारामतीतच उपोषण करुन सरकारला जेरीस आणलं. मनसेनेही शेट्टींच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. त्याआधी अण्णा हजारेंच्या आंदोलनाने केंद्र सरकारच्या तोंडाला फेस आणला होता. या पार्श्वभूमीवर मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आघाडी केली नाही तर पानीपत निश्चितच होईल हे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला चांगलचं माहित आहे. त्यामुळेच येत्या निवडणुकांना एकत्र सामोरं जाण्याचा निर्णय झाला आहे.