बाप्पाला निरोप देताना महिलेचा विनयभंग!

Last Updated: Saturday, September 21, 2013, 06:56

गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीतील गर्दीचा फायदा घेत काही नीच आणि नराधम प्रवृत्तीच्या तरूणांनी एका महिलेचा कसा विनयभंग केला, याची छायाचित्रंच ‘मिड डे’ या इंग्रजी वृत्तपत्राने प्रकाशित केलीत.

गणेश विसर्जन मिरवणुकीत गोळीबार, राजेश कदमांना अटक

Last Updated: Friday, September 20, 2013, 09:12

गणेश विसर्जन मिरवणुकीत हवेत गोळीबार करणारे बाल मित्र मंडळाचे अध्यक्ष राजेश कदम यांना अटक करण्यात आली. सचिन देसाई आणि प्रताप कनोडिया या दोघा कार्यकर्त्यांनाही अटक झाली आहे.

सोशल नेटवर्किंग साईटवर एक व्हिडिओ क्लिप चर्चेची

Last Updated: Friday, September 20, 2013, 08:21

गणेशोत्सवाच्या धामधुमीत राज्यातील अनेकांच्या व्हॉट्सअपवर, फेसबुकवर एक व्हिडिओ क्लिप चर्चेची विषय ठरली. लालबागच्या राजाचे मुजोर कार्यकर्ते सामान्य भाविकांशी कसे वागतात? त्याचं दर्शन घडविणारी ही क्लिप होती.

गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट, ८ जणांचा मृत्यू

Last Updated: Thursday, September 19, 2013, 09:54

राज्यात गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागलं आहे. राज्यात तब्बल आठ जणांचा विसर्जन मिरवणुकीदरम्यान मृत्यू झालाय.

बाप्पाला निरोप : मुंबई-पुण्यातील रस्ते फुलले, लालबाग राजाचे विसर्जन

Last Updated: Thursday, September 19, 2013, 09:22

मुंबई आणि पुण्यात गणरायाच्या विसर्जनाचा दरवर्षीप्रमाणे यंदाही अभूतपूर्व उत्साह होता. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबई आणि पुण्याचे रस्ते गणेशभक्तांनी फुलले होते. मुंबईत लालबागचा राजा आणि पुण्यात दगडूशेठ गणपतीचं विसर्जन करण्यात आलंय.

गणपती आड तीन`पत्ती`!

Last Updated: Thursday, September 19, 2013, 00:18

गणपती उत्सव सुरू झाला की सगळीकडेच कसं उत्सवाचं वातावरण असतं. दहा दिवस सगळेच भक्तीच्या रसात रंगतात. मात्र या उत्सवाच्या काळात आणखी एक जमात फॉर्मात येते आणि ती म्हणजे जुगा-यांची.

लाडू विकत घ्या, नशीब आजमवा...

Last Updated: Wednesday, September 18, 2013, 13:26

हैदराबादच्या बाळापूरमध्ये सर्वात महागड्या लाडवाचा लिलाव झालाय. या लाडवाची किंमत आहे ९ लाख २६ हजार रुपये... आश्चर्य वाटून घेऊ नका... हा अनमोल लाडू एका कुटुंबानं विकत घेतला बाप्पाला त्याचा नैवेद्यही दाखवला.

गणेश भक्तांनो सावधान! गिरगाव चौपाटीवर `स्टिंग रे`

Last Updated: Wednesday, September 18, 2013, 14:19

गिरगाव चौपाटीवर स्टिंग रे सदृश मासे सापडल्यानं बीएमसी अधिकारी घटनास्थळी तपासणीसाठी दाखल झालेत. मासे बॉटलमध्ये टाकून तपासणीसाठी नेण्यात आले आहेत. गणेश भक्तांनो समुद्रात जाताना घबरदारी घ्या. नाहीतर तुमच्या जीवावर धाडस बेतू शकते.