Last Updated: Tuesday, February 26, 2013, 15:08
www.24taas.com, नवी दिल्लीलोकसभेत रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी मंगळवारी रेल्वे अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पाला महाराष्ट्रातील खासदारांनी तीव्र विरोध केला आहे.
अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाट्याला स्थान न दिल्याने खासदारांनी संताप व्यक्त केलाय. शिवसेना आणि भाजप खासदारांबरोबरच आता राष्ट्रवादीच्या खासदारांनी विरोध केलाय.
रेल्वे अर्थसंकल्पानंतर शिवसेना आणि भाजप खासदारांनी विरोध केला. खासदारांनी विरोध करताना बैठक घेण्याचे जाहीर केले. तर राष्ट्रवादीच्या खासदारांचा रेल्वे अर्थसंकल्पाला विरोध असल्याचे ठाण्याचे खासदार संजीव नाईक यांनी सांगितले. महाराष्ट्रावर अन्याय झाल्याचे खा. नाईक यांनी म्हटले आहे.
मुंबईत सहा आणि ठाण्यात चार खासदार असताना रेल्वे अर्थसंकल्पात मुंबईच्या पदरी निराशा आली आहे. रेल्वे अर्थसंकल्पात केवळ ७२ नव्या लोकल आणि लोकलच्या गाड्यांना वातानुकुलीत (AC) डबे जोडण्याचा विचार करण्यात आला आहे. केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्पात महाराष्ट्राला आणि मुंबईला काय मिळणार याची उत्सुकता होती.
मात्र, आधींच्या निराशाजनक अर्थसंकल्पांचा विचार करता, यावेळी मुंबईसाठी थोडीशी खुशखबर देण्याचा प्रयत्न झाला आहे. मात्र महाराष्ट्राच्या वाट्याला निराशाच आली. मात्र, कोलकातासाठी १८ गाड्या सुरू करण्यात आल्याचे दिसून येत आहे. तर सोनिया गांधी यांच्या रायबरेलीत कारखाना काढला गेलाय. काँग्रेसने आपल्या क्षेत्राचा विचार केल्याचे बोलले जात असून यामुळे संपात व्यक्त होत आहे.
First Published: Tuesday, February 26, 2013, 14:59