Last Updated: Tuesday, February 26, 2013, 16:30
www.24taas.com, मुंबईमहाराष्ट्रातले खासदार या रेल्वे बजेटवर नाराज आहेत. महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रावादीचे खासदारही या बजेटवर संतप्त आहेत. याचसंदर्भात दिल्लीमध्ये सेंट्रल हॉलमध्ये सेना, भाजप आणि राष्ट्रवादीच्या खासदारांची बैठक सुरू झाली आहे.
रेल्वे बजेटमध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला निराशा आलीय. मुंबईसाठी तर बजेटमध्ये काहीच नाही. त्यामुळे महाराष्ट्रातले शिवसेना-भाजपसह राष्ट्रवादीचे खासदारही संतप्त आहेत.सगळेच खासदार प्रचंड संतापलेत.
महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या वाट्याला काहीच न आल्यानं, खासदार या बजेटला विरोध करणार आहेत.
First Published: Tuesday, February 26, 2013, 16:04