Last Updated: Tuesday, February 26, 2013, 15:28
www.24taas.com, नवी दिल्लीकेंद्रीय रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी आज लोकसभेत रेल्वे बजेट मांडला. या रेल्वे बजेट राज्यासह देशाचीही निराशाच केली असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. प्रवासी भाडेवाढ नाही, असं म्हणत प्रवाशांना दिलासा दिल्याचा देखावा केला गेला. मात्र लगेचच अधिभारामध्ये भाडेवाढ केली असल्याचे सांगून प्रवाशांची पुन्हा एकदा जादाचे पैसे द्यावेच लागणार असल्याचे स्पष्ट झाले.
मात्र या रेल्वे बजेटमध्ये एक चांगली तरतूद करण्यात आली आहे. रेल्वेमध्ये अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे या पदांवर लवकरच भरती करण्यात येणार असल्याचे नमूद केले आहे.
तब्बल १ लाख ५२ हजार जागांवर रेल्वेमध्ये भरती करण्यात येणार आहे. त्यामुळे देशभरात लवकरच रेल्वेच्या विविध पदांसाठी ही रेल्वेभरती करण्यात येणार असल्याचे समजते. यातील किती जागा महाराष्ट्रासाठी असणार आहेत हे मा६ स्पष्ट झालेले नाही.
First Published: Tuesday, February 26, 2013, 14:59