Last Updated: Tuesday, February 26, 2013, 15:20
www.24taas.com, नवी दिल्ली रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी मंगळवारी लोकसभेत रेल्वे अर्थसंकल्प सादर करताना रेल्वे यंदा पुन्हा एकदा तोट्यात जाण्याची शक्यता व्यक्त केलीय.
येत्या ३१ मार्च रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षात रेल्वेला जवळजवळ २४,६०० करोड रुपयांचं नुकसान होऊ शकतं, अशी शक्यता रेल्वेमंत्र्यांनी व्यक्त केलीय. हा तोटा मागच्यावर्षी (२०१२-१३) २२,५०० करोड रुपये होता.
बन्सल यांच्या म्हणण्यानुसार, रेल्वेला होणाऱ्या तोट्यात गेल्या दशकापासून सातत्यानं वाढ होतेय. रेल्वेचा २००२-०३ या वर्षीचा तोटा ४,९५५ करोड रुपये इतका होता. काँग्रेसचे रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी पहिल्यांदाच रेल्वे बजेट सादर केलंय. गेल्या १७ वर्षांत रेल्वे बजेट सादर करणारे बन्सल हे काँग्रेसचे पहिले मंत्री ठरलेत.
First Published: Tuesday, February 26, 2013, 15:16