Last Updated: Tuesday, February 26, 2013, 14:56
www.24taas.com, नवी दिल्ली रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी मंगळवारी लोकसभेत रेल्वे अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी, यावर्षीच्या अखेरपर्यंत रेल्वे नवी ई-तिकीट प्रणाली सुरू करणार असल्याचं म्हटलंय. ज्यामुळे ऑनलाईन तिकीट बुकींग सेवेला गती प्राप्त होऊ शकेल.
या नव्या प्रणालीमध्ये एका मिनिटांच्या आतमध्ये ७,२०० तिकीट बुक करण्याची क्षमता असेल. सध्याच्या प्रणालीमध्ये ही क्षमता एका मिनिटांत २,००० तिकीट बुक करण्याची आहे. ‘आयआरसीटीसी’च्या वेबसाईटवर धिम्या गतिनं काम होत असल्यानं प्रवाशांना होणाऱ्या असुविधेचा उल्लेख करताना बन्सल यांनी यावर उपाय म्हणून नवीन ई-तिकीट प्रणाली अस्तित्वात आणणार असल्याचं म्हटलंय.
काही महत्त्वाचे मुद्दे > रेल्वे सुविधांसाठी `आधारकार्डा`चा वापर करण्याविषयी विचार सुरू
> सर्व रेल्वेगाड्यांमध्ये वाय-फायची सुविधा उपलब्ध करून देणार
> रात्री ११.३० ते १२.३० रेल्वे ऑनलाईन तिकिट विक्रि बंद राहणार
> सर्व स्टेशन्सवर इलेक्ट्रॉनिक डिसप्ले बसवणार
> नागपुरमध्ये मोठे प्रशिक्षण केंद्र उभारणार
> सुपरफास्ट आणि तात्काळ तिकीट दरांत वाढ
> आरक्षण आणि रद्दीकरण शूल्क वाढणार
First Published: Tuesday, February 26, 2013, 14:56