गंगा घाटावर भावी पंतप्रधानांनी केली आरती!

Last Updated: Saturday, May 17, 2014, 20:28

प्रचारादरम्यान जी राहून गेली होती, ती गंगा आरती आज नरेंद्र मोदी वाराणसीत जाऊन करणार आहेत. यासाठी, ते वाराणसीत दाखल झालेत.

अपेक्षित यश न मिळ्याने राजीनामा - नितीश कुमार

अपेक्षित यश न मिळ्याने राजीनामा - नितीश कुमार

Last Updated: Saturday, May 17, 2014, 17:28

बिहारमध्ये जनता दल युनाटेड पक्षाला लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे लोकसभेचा पराभव जिव्हारी लागल्याने मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या पदाचा थेट राजीनामा दिला. नितीश यांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा सोपल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

नीतीश कुमारांनी दिला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

Last Updated: Saturday, May 17, 2014, 17:16

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर नीतीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलाय. नीतीश कुमार यांनी आज राज्यपालांकडे आपला राजीनामा सुपूर्द करून बिहार विधानसभा भंग करण्याची मागणी केलीय.

पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा राजीनामा मंजूर

पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा राजीनामा मंजूर

Last Updated: Saturday, May 17, 2014, 15:22

देशाचे मावळते पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी देशाला संबोधित केलेल्या निरोपाच्या भाषणात स्वत:च्या कारकिर्दीतील निर्णयांचे समर्थन केले. त्यांचे भाषण झाल्यानंतर त्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे सादर केला. राष्ट्रपतींनी त्यांचा राजीनामा स्वीकारला.

मोदींचे जोरदार स्वागत, सरकार स्थापनेसाठी वेग

मोदींचे जोरदार स्वागत, सरकार स्थापनेसाठी वेग

Last Updated: Saturday, May 17, 2014, 15:15

लोकसभा निवडणुकीतील अभूतपूर्व आणि ऐतिहासिक यशानंतर आता केंद्रात नव्या सरकार स्थापनेसाठीच्या हालचालींना वेग आलाय. आज दिल्लीत भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक झाली. या बैठकीत नरेंद्र मोदींच्या शपथविधीची तारीख करण्यात येईल, असे सांगण्यात येत होते, मात्र तारीख निश्चित करण्यात आलेली नाही.

मोदींच्या विजयात कोणती राज्य गेमचेंजर ठरली?

मोदींच्या विजयात कोणती राज्य गेमचेंजर ठरली?

Last Updated: Monday, May 19, 2014, 09:42

भाजप पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदींच्या विजयात मोठा वाटा आहे तो काही राज्यांमध्ये भाजपनं मिळवलेल्या दणदणीत विजयाचा.. पाहूयात ही कोणती राज्य गेमचेंजर ठरली ती.

यापुढेही भारताची प्रगती होत राहो - मनमोहन सिंग

यापुढेही भारताची प्रगती होत राहो - मनमोहन सिंग

Last Updated: Saturday, May 17, 2014, 12:47

काँग्रेस सरकारच्या काळात आम्ही चांगले काम केले. गेल्या दहा वर्षांमध्ये आम्ही जे प्रगतीचे टप्पे पार केले आहेत, यापुढेही अशीच भारताची प्रगती होत राहो, अशी आशा भारताचे मावळते पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी व्यक्त केली.

मोदींच्या `विजय` यात्रेस दिल्लीत सुुरुवात

मोदींच्या `विजय` यात्रेस दिल्लीत सुुरुवात

Last Updated: Saturday, May 17, 2014, 12:32

विजयानंतर सबका साथ, सबका विकास, असा नवा नारा देत देशाचे भावी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बडोद्यात जोशपूर्ण आणि भावपूर्ण भाषण केलं. सुरुवातीलाच त्यांनी बडोद्याच्या जनतेचे आभार मानले. आजपासून चांगले दिवस सुरू झालेत. देशातल्या जनतेसाठी शरीरातला कण न् कण आणि क्षण अन् क्षण वेचणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, अशा विश्वास त्यांनी देशातल्या जनतेला दिला. आज नवी दिल्लीत भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी राजधानी दिल्लीत दाखल झाले असून, विमानतळापासून त्यांच्या `विजय`यात्रेस सुरुवात झाली आहे.

पहिल्यांदा काँग्रेसशिवाय भाजपचं `शुद्ध सरकार` : मोदी

पहिल्यांदा काँग्रेसशिवाय भाजपचं `शुद्ध सरकार` : मोदी

Last Updated: Friday, May 16, 2014, 19:47

देशात पहिल्यांदा काँग्रेसशिवाय पूर्ण बहुमत जर कुणाला मिळालं असेल तर ते भारतीय जनता पार्टीला मिळालं आहे. हे काँग्रेसशिवाय भाजपचं शुद्ध सरकार असल्याचं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

सोनिया गांधी यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली

सोनिया गांधी यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली

Last Updated: Friday, May 16, 2014, 16:49

काँग्रेस अध्यक्ष या नात्याने, मी पराभवाची जबाबदारी स्वीकारते, असं सांगून सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे.