ऐतिहासिक `पलंग बारव` दोनशे वर्षांनी कोरडा!

Last Updated: Sunday, April 14, 2013, 22:39

दुष्काळाची दाहकता जालन्यात आणखीच भीषण झाली आहे. दुष्काळामुळे विहिरी तर आटल्याच पण जालन्यात प्रसिद्ध असलेली दोनशे वर्षापूर्वीची पलंग बारवही या दुष्काळाचा बळी ठरली.

मदत नाही तर ‘मरण’ द्या!

Last Updated: Friday, April 12, 2013, 16:06

औरंगाबाद जिल्ह्यातलेच शेतकरी सांडू जाधव य़ांनी आत्महत्येस परवानगी द्यावी अशी मागणी सरकारकडे केली होती...

आकांत : दुष्काळाला कंटाळून मोसंबीची बाग दिली पेटवून

Last Updated: Friday, April 12, 2013, 14:27

दुष्काळाच्या ग्रहणाला कंटाळून औरंगाबादमध्ये एका शेतकऱ्यानं आपल्या जीवापाड जपलेली मोसंबीची बाग पेटवून दिलीय. औरंगाबाद जिल्ह्यातल्या सांजखेडा गावात ही हृदयद्रावक घटना घडलीय.

शिवसेनेनेही आंदोलनाची पातळी सोडली

Last Updated: Wednesday, April 10, 2013, 14:22

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या विधानांनतर सर्वच स्तरातून त्यांच्यावर टीका सुरु झालीय. अनेक संघटनांनी त्याचा निषेध केलाय. हा निषेध कायम आहे. मंगळवारी औरंगाबादमध्ये अजित पवार यांच्या विरुद्ध आंदोलन करताना पवारांच्या पुतळ्याला शिवांबू पाजत जोडे मारले.

गोपीनाथ मुंडेंनी घेतले उपोषण मागे

Last Updated: Tuesday, April 9, 2013, 18:02

राज्यात दुष्काळाचे गहिरे संकट आहे. मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाचे उपनेते आणि खासदार गोपीनाथ मुंडे यांनी बेमुदत उपोषण सुरू केले. आज मुंडे यांनी आपले उपोषण मागे घेतले.

जालन्यात शौचालयाला मिळालं अजितदादांचं नाव

Last Updated: Tuesday, April 9, 2013, 16:32

महाराष्ट्राच्या विधीमंडळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शेतकऱ्यांच्या थट्टा उडविणाऱ्या वक्तव्याने गदारोळ माजला असताना भडकलेल्या कार्यकर्त्यांनी जालनामध्ये मात्र अजित पवार यांचे नाव एका शौचालयाला देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

साहेबांवर पाडला पैशांचा पाऊस, उडवल्या नोटा

Last Updated: Tuesday, April 9, 2013, 16:01

अजित पवारांच्या असभ्य वक्तव्यावरुन सुरु असलेल्या वादाचा धुराळा खाली बसत असतानाच, राजकीय नेत्यांच्या निर्ढावलेल्या पणाचा आणखी एक धक्कादायक प्रकार बुलढाण्यात उघडकीस आलाय.

सेना-भाजप युतीने केलं मनसेचं ‘कल्याण’

Last Updated: Monday, April 8, 2013, 20:21

शिवसेना आणि भाजप यांच्या युतीमुळे मनसेचं कल्याण झाल्याचे पाहायला मिळाले. पालिकेत मनसेच्या वाट्याला सभापतीपदी आले आहे. मनसेनेने युतीला सहकार्य केलं तर युतीने मनसेला साथ दिल्याचे चित्र पालिकेत पाहायला मिळाले.

अजित पवार नालायक, हाकालपट्टी करा - उद्धव

Last Updated: Sunday, April 7, 2013, 14:38

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अजितदादांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतलाय. अजित पवारांना शिवांबू पाजली पाहिजे, अशा शब्दांत त्यांनी तोफ डागलीये.

अजितदादांचा तोल सुटला `नको ते बोलून बसले`!

Last Updated: Sunday, April 7, 2013, 10:54

राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर सभेत मुक्ताफळे उधळली आहेत. स्वत:ला टग्या म्हणाऱ्या अजितदादांचा चांगला तोल सुटला. लोकांना उपदेशाचे ठोस देताना, नके ते बोलून बसलेय. त्यामुळे पुन्हा बेताल व्यक्तव्यामुळे अजित पवार अडचणीत येण्याची शक्यता आहे.