कोकण रेल्वे शिक्षा अभियानाचा ११,८३९ ग्रामस्थांना लाभ

कोकण रेल्वे शिक्षा अभियानाचा ११,८३९ ग्रामस्थांना लाभ

Last Updated: Tuesday, December 31, 2013, 16:29

कोकण रेल्वेने समाजामध्ये सकारात्मक बदल घडविण्यासाठी शिक्षा अभियान सुरू केले आहे. आतापर्यंत या अभियनाच्या माध्यमातून ११,८३९ ग्रामस्थांनी लाभ घेतला आहे, अशी माहिती कोकण रेल्वेच्या जनसंपर्क अधिकारी वैशाली पतंग यांनी दिली.

नववर्षाच्या स्वागतासाठी कोकण हाऊसफुल्ल

Last Updated: Tuesday, December 31, 2013, 08:11

कोकणचा सौंदर्य प्रत्येकाला खुणावतोच. निळा क्षार समुद्र किनारा आणि इथलं सौदर्य अनेक पर्यटकांना आकर्षित करतं. त्यामुळेच यावर्षी नववर्षाचं स्वागत कोकणात करावं याच बेताने. सध्या कोकण पर्यटकांनी हाऊसफुल झालय. एमटीडीसीची सर्व रिसॉर्ट आणि हॉटेल्सची आरक्षण जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत फुल्ल झालीयेत.

भाजपची अशी ही बनवाबनवी...

भाजपची अशी ही बनवाबनवी...

Last Updated: Saturday, December 28, 2013, 10:02

ठाण्याचे माजी उपमहापौर मिलिंद पाटणकर यांनी आपण कर्नाटकात हवापालटासाठी आलो आहोत आणि कुटुंबीयांच्या संपर्कात आहोत, असं सांगितलं होतं. मात्र केवळ कुटुंबियच नव्हे, तर स्थानिक भाजप नेत्यांच्याही ते संपर्कात असल्याचे पुरावे झी मीडियाच्या हाती आलेत. त्यामुळे ठाण्यातील भाजपचे बनवाबनवीचे राजकाण पुढे आलेय.

एका चौकात सेनेचे एक तर राष्ट्रवादीचे दुसरे शिवाजी महाराज!

एका चौकात सेनेचे एक तर राष्ट्रवादीचे दुसरे शिवाजी महाराज!

Last Updated: Friday, December 27, 2013, 18:55

ठाण्यात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उद्घाटनासाठी येणार असल्यानं आता ठाण्यातलं राजकारणं पुतळ्यांभोवती फिरु लागलय.

ठाणे पालिका राडा, सेना-भाजपच्या ५ जणांना अटक

Last Updated: Thursday, December 26, 2013, 12:48

ठाण्यामधल्या उपमहापौर मिलिंद पाटणकर यांच्या केबिनच्या तोडफोडप्रकरणी शिवसेना आणि भाजपच्या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. नौपाडा पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

थर्टी फर्स्टसाठी कोकणात पर्यटकांची गर्दी

थर्टी फर्स्टसाठी कोकणात पर्यटकांची गर्दी

Last Updated: Thursday, December 26, 2013, 11:17

थर्टी फर्स्टसाठी कोकणात पर्यटकांची गर्दी होवू लागलीय. कोकणातले समुद्रकिनारे सध्या गजबजलेत. पर्यटकांमुळे हॉटेलचे दरही दुप्पटीने वाढलेत. यंदा पर्यटकांची सर्वाधिक पसंती तारकर्ली बीचला. तसेच रत्नागिरीलाही पसंती आहे. गणपतीपुळे येथेही अशी परिस्थिती आहे.

काय हे महाराष्ट्रात, महिलेला विवस्त्र करून मारहाण

काय हे महाराष्ट्रात, महिलेला विवस्त्र करून मारहाण

Last Updated: Thursday, December 26, 2013, 09:03

रायगड जिल्ह्यात निवडणुकीच्या वादातून महिला विवस्त्र करून मारहाण करण्यात आली. रोहा तालुक्यातील खाजणी गावात ही धक्कादायक घटना घडली. दिराला मदत केल्यामुळे ही मारहाण झाली. या महिलेवर अलिबाग जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रकरणी पोलीसांनी ३५४ ब कलम दाखल केलं आहे. तसंच १५ जणांना अटक केली आहे.

पाणी मागण्याच्या बहाण्याने दापोलीत भरदिवसा दरोडा

पाणी मागण्याच्या बहाण्याने दापोलीत भरदिवसा दरोडा

Last Updated: Thursday, December 26, 2013, 08:22

रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा एकदा भरदिवसा दरोडा पडलाय. दापोली तालुक्यात पाणी मागण्याच्या बहाण्याने दरोडा टाकण्यात आला. याआधी रत्नागिरीतील जाकादेवी येथे बॅंकेवर दरोडा टाकण्यात आला होता. दरोड्याचे सत्र सुरू असल्याने रत्नागिरी जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. २० ते २५ वयोगटातील तरूणांनी हा दरोडा टाकला. दरोड्याच्यावेळी महिलेचे हात-पाय बांधून लाखाचा ऐवज लंपास करण्यात आलाय.

अहमदाबाद-मुंबई महामार्गावरील वर्सोवा ब्रिज वाहतूक दोन महिने  बंद

अहमदाबाद-मुंबई महामार्गावरील वर्सोवा ब्रिज वाहतूक दोन महिने बंद

Last Updated: Wednesday, December 25, 2013, 12:31

अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८ वरील फाउनटन हॉटेलच्या पुढील जुन्या वर्सोवा ब्रिजला २१ डिसेंबरला तडे गेल्याने या महामार्गावरील गुजरातच्या दिशेने जाणारी वाहतुकीची लेन उद्या सकाळपासून दोन महिन्यासाठी बंद करण्यात येणार आहे.

`लंडन गॅझेट` ला उत्तर ‘शिवाजी द रियल हिरो’ने

Last Updated: Wednesday, December 25, 2013, 12:42

२० फेबुवारी १६७२ च्या `लंडन गॅझेट` या नियतकालिकात छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख दरोडेखोर, लुटारू असा केला होता. म्हणून त्याच लंडनमध्ये शिवरायांचे ‘शिवाजी द रियल हिरो’ या पुस्तकाचं प्रकाशन उद्वेली बुक्स करणार आहे. शिवजयंतीला १ मार्च २०१४ रोजी या पुस्तकच प्रकाशन प्रसिध्द प्रवचनकार,धर्मभूषण,भारताचार्य प्रा. सु. ग. शेवडे यांच्या हस्ते होणार आहे.