पाइपलाईन फुटली, ठाण्यात पाणीच पाणी

Last Updated: Saturday, April 28, 2012, 08:50

एकीकडे राज्यात अनेक ठिकाणी नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असताना ठाण्यात मात्र पालिकेच्या हलगर्जीपणामुळे हजारो लीटर पाणी वाया गेले आहे. ठाण्याच्या कॅडबरी नाक्यावर शुक्रवारी रात्री १० च्या सुमारास पालिकेची ६५० मिलीमीटर व्यासाची पाण्याची पाइपलाईन फुटली.

ठाण्याच्या तलावातून मगरीची पाठवणी

Last Updated: Thursday, April 26, 2012, 20:16

ठाण्याच्या उपवन तलावामध्ये गेल्या 12 वर्षांपासून मुक्काम ठोकून असलेल्या मगरीला वन विभागानं पकडून बोरीवलीच्या राजीव गांधी राष्ट्रीय उद्यानातील तुलसीविहार या तलावात रवानगी केली

मध्ये रेल्वेवर दगडफेक, कर्जत सेवा ठप्प

Last Updated: Thursday, April 26, 2012, 11:09

अंबरनाथ लोकलमध्ये विठ्ठलवाडी रेल्वेस्थानकादरम्यान बिघाड झाल्याने वाहतूक काही वेळ खोळंबली. मात्र, लोकल उशीरा धावत असल्याचे पाहून संतप्त प्रवाशांनी अंबरनाथ येथे रेल्वे रोखल्या आणि गाड्यांवर दगडफेक केली. त्यामुळे वाहतुकीचा अधिकच खोळंबा झाला. मध्य रेल्वेच्या भोंगळ कारभाराविरोधात संताप व्यक्त होत आहे.

खासगीकरणातून रत्नागिरीत आंग्रे पोर्ट

Last Updated: Wednesday, April 25, 2012, 11:45

महाराष्ट्राच्या पश्चिम सागरी किनाऱ्यावर रत्नागिरीपासून जवळच असलेल्या जयगड किल्ल्याच्या आडोशाला खासगीकरणातून आंग्रे पोर्ट उभारण्यात आले आहे. देशातील बहुदा हा पहिलाच खासगी करणाचा प्रयत्न आहे. या बंदराचे अक्षय तृतियेला उद्घाटन करण्यात आले.

रत्नागिरीत चोर शिरजोर, कायदा कमजोर

Last Updated: Tuesday, April 24, 2012, 18:15

रत्नागिरीत सध्या चोर दरोडेखोरांनी धुमाकूळ घातलाय. गेल्या काही दिवसांत शहरात सातत्यानं घरफोड्या होत आहेत. अपु-या पोलीस बळामुळं रत्नागिरीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय.

दिवा स्टेशनवर गोळीबार, एकाचा मृत्यू

Last Updated: Tuesday, April 24, 2012, 14:37

ठाण्यातील दिवा स्टेशनवर भरदिवसा गोळीबार करण्यात आला आहे. गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आहे. सुमित म्हात्रे असं या नागरिकाचं नाव आहे. शुल्लक वादातून ही हत्या झाल्याचं सांगण्यात येतं आहे.

सेना नगरसेवकांच्या नावे बनावट लेटरहेड

Last Updated: Tuesday, April 24, 2012, 10:36

अंबरनाथमध्ये नगरसेवकांचे बनावट स्टॅम्प आणि लेटरहेड तयार करणारी टोळी नगरसेवकानेच पकडून दिली आहे. उल्हासनगरचे शिवसेना नगरसेवक प्रधान पाटील यांच्या नावाचे बनावट लेटरहेड बनविले जात होते.

पाण्याची तहान ठरली जीवघेणी

Last Updated: Monday, April 23, 2012, 18:13

वणवण करतांना ठाणे जिल्ह्यात घरासाठी पाण्याचे हंडे भरणाऱ्या पार्वती जाधव हिचा पाणी भरताना मृत्यू झाला आहे. विहिरीजवळच झालेल्या या मृत्यूने शासनाच्या टँकरने पाणीपुरवठा करणारी योजनेतील फोलपणा उघड झालाये

आम्ही भांडू पण एकत्रच नांदू- शरद पवार

Last Updated: Monday, April 23, 2012, 17:37

दोन्ही काँग्रेसमधल्या वादावर अखेर पडदा पडल्याचं खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलंय. स्थानिक स्वराज्य संस्थातल्या वादाचा राज्यात किंवा केंद्रातल्या आघाडीवर परिणाम होणार नाही असं पवार म्हणालेत. तर मुख्यमंत्र्यांनीही आघाडीत सर्वकाही आलबेल असल्याचं सांगत वादावर पडदा टाकला आहे

पतीला अटक, सासू, सासऱ्यांविरूध्द गुन्हा

Last Updated: Monday, April 23, 2012, 15:37

नवी मुंबईतील खारघरमधल्या महिलेच्या आत्महत्त्येप्रकरणी तिचा पती प्रशांत वहाळला अटक केली आहे. सासू, सासरे आणि नणंदेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.