मोबाईलवर गाणी ऐकणे पडले महाग

Last Updated: Tuesday, January 21, 2014, 15:01

तुम्ही मोबाईलवर बोलत आहात किंवा गाणी ऐकत असताल तर जरा जपून. तुम्हाला लागलेली तंदरी महाग पडू शकते. असाच प्रकार ठाण्यात घडला. मोबाईलवर बोलत असताना एकाला धक्का लागला आणि त्याला चांगलाच चोप मिळाला. ही घटना वागळे इस्टेट येथील रायलादेवी तलाव परिसरात घडली.

कोकण रेल्वेला रो रो सेवेतून वर्षाला ५० कोटींचे उत्पन्न

कोकण रेल्वेला रो रो सेवेतून वर्षाला ५० कोटींचे उत्पन्न

Last Updated: Tuesday, January 21, 2014, 13:09

कोकण रेल्वे मार्गावर १५ वर्षांपूर्वी सुरू केलेल्या रोल ऑन रोल ऑफ म्हणजेच रो-रो सेवेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या सेवेच्या माध्यमातून कोकण रेल्वेला वर्षाला ५० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत आहे, अशी माहिती कोकण रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी वैशाली पंतंगे यांनी दिली.

दुसरीतल्या चिमुरड्यासोबत अनैसर्गिक कृत्य उघड

Last Updated: Tuesday, January 21, 2014, 12:14

महिला, मुली लैंगिक अत्याचाराच्या शिकार होत असल्यामूळ असुरक्षित असल्याच म्हटलं जातं. मात्र, लहान मुलींसह आत्ता अल्पवयीन चिमुरडी मुलंसुद्धा लैंगिक विकृतीचे शिकार होऊ लागल्याचं उघड झालंय.

त्यांना पाणी पडले महागात...शो रुममधून १.२२ लाख लंपास

त्यांना पाणी पडले महागात...शो रुममधून १.२२ लाख लंपास

Last Updated: Tuesday, January 21, 2014, 11:06

उल्हासनगरमधल्या गुरुदेव कुकरेजा यांना पाणी पिणं चांगलंच महाग पडलंय. कुकरेजा यांची एक लाख बावीस हजार आणि महत्वाचे कागदपत्रं असलेली बॅग एका शो रुममधून घेऊन चोरानं धूम ठोकली.

लिफ्ट देण्याचा बहाणा करून बलात्कार आणि हत्या

लिफ्ट देण्याचा बहाणा करून बलात्कार आणि हत्या

Last Updated: Monday, January 20, 2014, 22:53

लिफ्ट देण्याचं कारण सांगून वसईत अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला आहे. बलात्कारानंतर संबंधित मुलीची हत्याही करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पोलिसांच्या श्वान पथकाने थेट आरोपीचं घर गाठल्याने, आरोपीविरोधात सबळ आणि स्पष्ट पुरावे हाती आले आहेत.

`एमआयडीसी` प्रकल्पातून जाधवांची जमीन कशी वाचली?`

Last Updated: Saturday, January 18, 2014, 18:41

निसर्गरम्य कोकण सध्या भकास करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न दिसतोय. कारण गुहागर-चिपळूण तालुक्याच्या मध्यावर्ती अर्थात मार्गताम्हाणे येथे येऊ घालेल्या एमआयाडीसी प्रकल्पाला गावकऱ्यांनी विरोध दर्शवायलाय.

तटकरे-जाधव वाद केवळ चार भिंतीत मिटला, रत्नागिरीत वाद कायम

Last Updated: Friday, January 17, 2014, 15:11

कोकणातील राष्ट्रवादीच्या दोन मात्तबर नेत्यांमधला वाद राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी मिटवला खरा. पण या दोन नेत्यांच्या वादात ज्या कार्यकर्त्यांनी उड्या घेतल्या त्यांच्यातील वाद मात्र अजून मिटलेला दिसत नाहीय.

मनसेकडून डोंबिवलीतील टोल नाक्याची तोडफोड

Last Updated: Thursday, January 16, 2014, 12:50

डोंबिवलीच्या काटई टोलनाक्यावर मनसेनं टोल बंद करण्याच्या मागणीसाठी तोडफोड केलीय. मनसेच्या कार्यकर्त्यांनी केबिनची तोडफोड केलीय. तोडफोड करणा-या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केलीय.

मार्लेश्वर -गिरीजा देवी...लग्न सोहळा याची देही याची डोळा

मार्लेश्वर -गिरीजा देवी...लग्न सोहळा याची देही याची डोळा

Last Updated: Wednesday, January 15, 2014, 11:33

रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर तालुक्यातील मार्लेश्वर देवाचा कल्याणविधी अर्थात विवाह सोहळा संपन्न झाला.

ठाण्यात कुत्र्याला धडक दिल्यानं स्कूलबसची तोडफोड

Last Updated: Monday, January 13, 2014, 14:22

ठाण्यातले माजी नगरसेवक रामभाऊ फडतरे यांच्या पाळीव कुत्र्याला स्कूलबसची धडक लागली. त्यात तो कुत्रा जखमी झाला. त्यामुळं संतापलेल्या फडतरेंच्या कार्यकर्त्यांनी रॅम्बो स्कूलच्या दोन बसेस फोडल्या.