वाहन बाजार चालकांच्या व्यवहारांबाबत पोलीस गंभीर नाहीच

वाहन बाजार चालकांच्या व्यवहारांबाबत पोलीस गंभीर नाहीच

Last Updated: Thursday, September 26, 2013, 19:21

पोलीस आयुक्तांनी सर्व वाहन बाजार चालकांना दैनंदिन व्यवहाराची माहिती देणं सक्तीचं केलं होतं. मात्र या घोषणेला आता वर्ष उलटून गेलं तरीही ना वाहन बाजार चालक या आदेशाला गांभीर्यानं घेत नाहीत. आणि पोलीस अधिकारीही याबद्दल गंभीर नाहीत.

पाण्यासाठी संगमनेर, निफाडच्या ग्रामस्थांचं आंदोलन!

Last Updated: Thursday, September 26, 2013, 10:45

दारणासह गंगापूर धरण तुडूंब भरलं असून मोठ्या प्रमाणत पाण्याचा विसर्ग सुरु आहे. गोदावरी ओसंडून वाहत असताना गोदावरीचे डावा आणि उजवा कालवा बंद करण्यात आलेत.

चोरांची अनोखी स्टाईल, महागड्या कारमधून चोरायचे टाईल्स

चोरांची अनोखी स्टाईल, महागड्या कारमधून चोरायचे टाईल्स

Last Updated: Wednesday, September 25, 2013, 17:30

नाशिकमध्ये बांधकाम व्यायसायिकांना सध्या फरशी चोरांची धास्ती भरलीय. सोनसाखळी चोरी, मोटार सायकल चोरीनंतर आता चोरट्यांनी बांधकाम व्यवसायिकांच्या साईटकडे मोर्चा वळवलाय. पोलिसांनी पाच जणांच्या टोळीला रंगेहात पकडलंय.

देवळाली: सैन्य भरती दरम्यान चेंगराचेंगरी

देवळाली: सैन्य भरती दरम्यान चेंगराचेंगरी

Last Updated: Tuesday, September 24, 2013, 15:43

नाशिकमध्ये देवळाली लष्करी कॅम्पमध्ये प्रादेशिक सेनेच्या भरती प्रक्रियेवेळी नाशिक शहरात विद्यार्थ्यांची चेंगराचेंगरी झालीय.

ही मनसेवर नामुष्की आहे का?

ही मनसेवर नामुष्की आहे का?

Last Updated: Tuesday, September 24, 2013, 13:52

नाशिक शहराचा प्रारुप विकास आराखडा अखेर रद्द करण्यात आलाय. आक्रमक विरोधक आणि शेतकऱ्यांपुढं सत्ताधारी मनसेला अखेर माघार घ्यावी लागली. पालिकेच्या महासभेत ११ तासांच्या मॅरेथॉन चर्चेनंतर महापौरांनी प्रारूप आराखडा रद्द करण्याची घोषणा केलीय.

पाच वर्षांनी पुन्हा राहुल गांधींचा नागपूर दौरा

पाच वर्षांनी पुन्हा राहुल गांधींचा नागपूर दौरा

Last Updated: Monday, September 23, 2013, 17:46

आत्महत्याग्रस्त शेतक-याची पत्नी कलावती यांच्या भेटीमुळे राहुल गांधींचा पाच वर्षांपूर्वीचा विदर्भ दौरा चांगलाच गाजला होता. त्यानंतर तब्बल पाच वर्षांनी राहुल गांधी मंगळवारी एक दिवसाच्या विदर्भ दौ-यावर येतायत.

`दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना अटक झालीच पाहिजे`

`दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना अटक झालीच पाहिजे`

Last Updated: Saturday, September 21, 2013, 19:01

एक महिना उलटला तरी डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना अटक करण्यात पुणे पोलिसांना यश आलेलं नाही. डॉ. दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना त्वरीत अटक करा, अशी मागणी करत अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यांनी आज राज्यभर आंदोलन सुरु केलंय.

राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टचं खासगीकरण!

राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टचं खासगीकरण!

Last Updated: Thursday, September 19, 2013, 20:43

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं ड्रीम प्रोजेक्ट असणा-या गोदापार्कचं खाजगीकरण आता रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यामतून करण्यात येणार आहे.

स्वस्त भाजीपाला केंद्राची `कांदेदुखी`!

स्वस्त भाजीपाला केंद्राची `कांदेदुखी`!

Last Updated: Thursday, September 19, 2013, 20:25

नाशिकमध्ये स्वस्त भाजीपाला केंद्रांचा पुरता बो-या वाजलाय. त्याचं खापर कृषिमंत्र्यांनी नाशिकच्या अधिका-यांवर फोडलंय. त्यातच कांद्याच्या बाबतीत सरकारनं जो घोळ चालवलाय,

उन्हाळी कांद्याला सोन्याचा भाव!

Last Updated: Tuesday, September 17, 2013, 11:35

उन्हाळी कांद्याची घटत चाललेली आवक आणि पावसामुळं लाल कांद्याचं बाजारात लांबलेलं आगमन यात सापडलेल्या घाऊक बाजारात उन्हाळी कांद्याचे भाव चढेच आहेत.