पुण्यातील महिलांनो जरा सावध रहा !

Last Updated: Thursday, March 7, 2013, 12:40

पुणेकरांनो सावधान ! पुण्यामध्ये सोनसाखळी चोरांचा अक्षरश: धुमाकूळ सुरु आहे. महिलांचे सोन्याचे दागिने हिसकावण्याच्या एकाच दिवसात ६ घटना घडल्या आहेत.

स्टेट बँकेची इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी!

Last Updated: Wednesday, March 6, 2013, 08:11

पुण्यातल्या हिराबाग चौकामधल्या स्टेट बॅँक ऑफ इंडियाच्या इमारतीला आज पहाटे पाचच्या सुमारास आग लागली. या आगीचं नेमक कारण अजून समजलेलं नाही.

पुण्यात जर्मन बेकरी पुन्हा सुरू होणार?

Last Updated: Tuesday, March 5, 2013, 21:06

पुण्यावर झालेला पहिला दहशतवादी हल्ला म्हणजे जर्मन बेकरीत झालेले बॉम्बस्फोट. या घटनेला तीन वर्ष झाली. स्फोटात उध्वस्त झालेली बेकरी पुन्हा सुरु करण्याचं काम सध्या जोरात सुरु आहे. बेकरी कधी सुरु होणार, याची पुणेकरांना देखील तेवढीच प्रतीक्षा आहे.

परप्रांतीय प्रकरण: मनसेच्या १० जणांवर गुन्हा दाखल

Last Updated: Tuesday, March 5, 2013, 16:43

साताऱ्यातल्या सैनिकी शाळेत प्रवेश प्रक्रियेत गोंधळ घातल्याप्रकरणी मनसे जिल्हाध्यक्षांसह १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फसवणूक करणाऱ्या भामट्यांना शिवसैनिकांचा चोप

Last Updated: Monday, March 4, 2013, 22:25

कमी पैशात सोने देण्याचा बहाणा करुन लोकांची फसवणूक करणा-या दोन भामट्यांना कोल्हापूरातील शिवसेना कार्यकर्त्यांनी चोप दिलाय.

राज ठाकरेंपुढे अजित दादा शांत का?

Last Updated: Monday, March 4, 2013, 19:22

राज ठाकरे आणि अजित पवार यांच्यात सुरु असलेल्या वाग्युद्धामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विशेषतः दादांचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

सांगली ग्रामसभेत काठ्या-तलवारींनी हाणामारी

Last Updated: Monday, March 4, 2013, 18:43

सांगली जिल्ह्यातील बनेवाडीच्या ग्रामसभेत जोरदार हाणामारी झाली. सत्ताधारी आणि ग्रामस्थ यांच्यामध्ये झालेल्या हाणामारीत तलवारी आणि काठ्यांचा वापर करण्यात आला.

मनसेचा राडा, साताऱ्यातून परप्रांतीयाना हुसकावले

Last Updated: Monday, March 4, 2013, 15:47

साताऱ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना राडा केल्याने येथील वातावरण तापले आहे. साताऱ्यातल्या सैनिकी शाळेत प्रवेश प्रक्रियेवरुन गोंधळ झालाय. उत्तरप्रदेश आणि बिहारच्या विद्यार्थ्यांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे. आज दुपारी ही घटना घडली.

`राज आणि अजित पवारांमधील युद्ध दुर्दैवी`

Last Updated: Sunday, March 3, 2013, 19:44

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात सुरु असणारे युद्ध दुर्दैवी असल्याची टीका वनमंत्री पतंगराव कदम यांनी केली. सांगलीमध्ये कदम प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

राज ठाकरे हे नकलाकार - सुशीलकुमार शिंदे

Last Updated: Sunday, March 3, 2013, 19:30

राज ठाकरे हे नकलाकार असून ते नकलाच करणार असा टोला केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावलाय. गेल्या आठवड्यात झालेल्या जाहीर सभेत राज ठाकरे यांनी शिंदे यांची खिल्ली उडविली होती. याची परतफेड शिंदे यांनी आज सोलापुरात पत्रकार परिषेदेत केली आहे.