वसुलीसाठी पालिकेकडून बँड, बाजा, बरात!

Last Updated: Saturday, March 16, 2013, 08:12

मिळकत कराची थकबाकी वसूल करण्यासाठी पुणे महापालिकेनं अनोखी शक्कल लढवलीय. ही थकबाकी न भरणाऱ्याऱ्यांची मात्र दारासमोर बँड, बाजा, बरात घेऊन आलेल्या पालिकेला पाहून चांगलीच धांदल उडाली.

मनपाच्या मानवताशून्य कारभाराने इतिहासतज्ज्ञांचा मृत्यू

Last Updated: Thursday, March 14, 2013, 20:54

पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या मानवता शून्य कारभाराचं अतिशय संतापजनक उदाहरण समोर आलं आहे. ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ प्रतापराव अहिरराव यांनी शहरात इतिहास संशोधन मंडळाची स्थापना केली. पालिका त्यांना या कामात मदत करेल अशी त्यांची अपेक्षा होती...

पुण्यात मनसेला हादरा, विरोधी पक्षनेते पद गोत्यात

Last Updated: Thursday, March 14, 2013, 16:30

मुंबई महापालिकेतील दणक्यानंतर आता पुण्यातही मनसेला जोरदार धक्का बसलाय. पुणे पालिकेत नगरसेविकेने वयाचा खोटा दाखला दिल्याने तिचे पद रद्द करण्याचा निर्णय पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे पालिकेतील मनसेचे पक्षीय बलाबल कमी होणार आहे. याचा फटका विरोधी पक्षनेते पदावर होण्याची शक्यता आहे.

शरद पवारांवर किती गुन्हे, दिल्ली पोलिसांची विचारणा

Last Updated: Wednesday, March 13, 2013, 12:02

महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणातील मोठ व्यक्तीमत्व केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्यावर पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गुन्हे दाखल आहेत का, अशी विचारणा दिल्लीतील पोलिसांनी केलीय. मात्र, ही माहिती कशासाठी हवीय त्याची माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे पुण्यात वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.

अडीच लाख रुपयांचं एक लिंबू!

Last Updated: Tuesday, March 12, 2013, 23:14

एका लिंबाची किंमत अडीच लाख रुपये आहे, असं तुम्हाला कुणी सांगितलं तर.. नक्कीच तुम्हाला धक्का बसेल.. पण हे खरं आहे.. पिंपरी चिंचवडमध्ये मोशी इथं श्रद्धेच्या नावाखाली लागलेल्या बोलीत एक लिंबू अडीच लाखांना घेतलं जातंय. एवढचं नाही तर देवाचा विडा 21 लाख 11 हजार रुपयांना घेतला जातोय. ऐन दुष्काळातही हा सर्व प्रकार सुरु आहे.. .

`अजितदादांनीच व्हावं मुख्यमंत्री!`

Last Updated: Monday, March 11, 2013, 18:51

राष्ट्रवादी काँग्रेसकडून 145 जागांवर दावा ठोकणा-या वसंत वाणींना शरद पवारांनी समज दिल्यानंतर त्यांनी आपल्या तलवारी म्यान केल्यात. पण तरीही दादांनी मुख्यमंत्री व्हावं हा आपला आग्रह मात्र त्यांनी कायम ठेवलाय.

राष्ट्रवादीच्या नगरसेविका सीमा फुगे यांचं पद रद्द

Last Updated: Monday, March 11, 2013, 09:37

पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादीच्या नगरसेविका सीमा फुगे यांच पद रद्द करण्यात आले आहे. त्यांनी बनावट जात प्रमाणपत्र सादर केल्याचे उघड झाल्याने आयुक्त श्रीकर परदेशी यांनी फुगे यांचे पद रद्द केलं. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हा धक्का मानला जात आहे.

वनाधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे अखेर `त्या` बिबट्याचा मृत्यू

Last Updated: Sunday, March 10, 2013, 20:43

अहमदनगरच्या भोकर गावात धुमाकूळ घालणा-या बिबट्याचा मृत्यू झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून धुमाकूळ घालणारा हा बिबट्या पारधी समाजाच्या मुलांनी लावलेल्या जाळ्यात खरंतर अडकला होता.

ऊर्जा प्रकल्पासाठी शेतकऱ्यांवर जबरदस्ती

Last Updated: Sunday, March 10, 2013, 19:11

अहमदनगर तालुक्यातील गर्भगिरी परिसरात उभारलेल्या पवन ऊर्जा प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनी इनरकॉन इंडिया कंपनीने शेतक-यांच्या इच्छा नसतानाही खरेदी केल्या. तसंच जे शेतकरी या कंपनीला विरोध करतात त्या शेतक-यांना कंपनीचे गुंड मारहाण करत असल्याची तक्रार शेतकरी करत आहेत.

सांगलीमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या?

Last Updated: Sunday, March 10, 2013, 16:57

दुष्काळग्रस्त सांगली जिल्ह्यात शेतक-याच्या आत्महत्येनं खळबळ उडाली आहे. बोरगी गावातील विजयकुमार बरडोल या शेतकऱ्यानं विष पिऊन आत्महत्या केली आहे.