मुंडे भाजपची 'गोमु' - आर आर पाटील

मुंडे भाजपची 'गोमु' - आर आर पाटील

Last Updated: Thursday, April 10, 2014, 07:07

भाजपमधील लोकांना आपली नावं बदलण्याची सवयच आहे. नमो म्हणजे नरेंद्र मोदी तर गोमु म्हणजे गोपीनाथ मुंडे असल्याची टीका गृहमंत्री आर. आर. पाटलांनी केलीय.

राज ठाकरेंवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

Last Updated: Thursday, April 10, 2014, 07:06

मरा पण नेत्यांना मारून मरा, या वादग्रस्त विधानानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर यवतमाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे राज हे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अडचणीत सापडले आहे.

खुनाचा आरोप असणारे डॉ.पद्मसिंग पाटील बाहेर कसे - उद्धव

खुनाचा आरोप असणारे डॉ.पद्मसिंग पाटील बाहेर कसे - उद्धव

Last Updated: Wednesday, April 9, 2014, 20:47

भ्रष्टाचाराचे आरोप असणारे शिवसेनेचे सुरेश जैन तुरुंगात तर खुनासारखा गंभीर आरोप असणारे राष्ट्रवादीचे डॉ.पद्मसिंग पाटील बाहेर कसे, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शरद पवारांना केलाय. हे काँग्रेस आघाडीचे कटकारस्थान आहे, असा आरोप उद्धव यांनी केला आहे.

मतदानापूर्वीचा विदर्भ: पैशांची लूट आणि दारूचा पूर

मतदानापूर्वीचा विदर्भ: पैशांची लूट आणि दारूचा पूर

Last Updated: Wednesday, April 9, 2014, 20:26

निवडणुकांमध्ये चालणारे काळे व्यवहार हा नेहमीच चर्चेचा विषय राहिलाय. काळ्या पैशांच्या वापरापासून ते अवैधरित्या दारूचा पुरवठ्यापर्यंत किंवा वस्तुंच्या बदल्यात आपलं बहुमूल्य मत विकत घेण्यापर्यंत अनेक प्रकार घडत असतात... हा प्रकार थांबवायचा असेल, तर आपल्यालाच संयम बाळगणं आणि सावध राहणं आवश्यक आहे.

नागपूर, विदर्भात दहा जागांसाठी 201 उमेदवार रिंगणात

नागपूर, विदर्भात दहा जागांसाठी 201 उमेदवार रिंगणात

Last Updated: Wednesday, April 9, 2014, 20:02

निवडणुकीसाठी संपूर्ण विदर्भ सज्ज झालाय. 10 लोकसभा मतदारसंघात एकूण 201 उमेदवार आपलं भवितव्य आजमावणार आहेत. नागपूर लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक 33 तर अकोला मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे सात उमेदवार आहेत. मतदानाच्या निमित्ताने सर्वच मतदारसंघात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय.

राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसचाच राणेंवर हल्लाबोल

राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसचाच राणेंवर हल्लाबोल

Last Updated: Wednesday, April 9, 2014, 19:48

काँग्रेसचे आमदार विजय सावंत यांनीही `घरचा आहेर` दिल्यानं उद्योगमंत्री नारायण राणेंची डोकेदुखी आणखी वाढलीय. राणेंनी सिंधुदुर्गातली काँग्रेस संपवली. आता जी अस्तित्वात आहे ती राणे समर्थक काँग्रेस आहे, असा तिखट हल्ला सावंत यांनी चढवलाय.

सुशीलकुमार शिंदेंनी सोलापूरसाठी काहीच केलं नाही- मोदी

सुशीलकुमार शिंदेंनी सोलापूरसाठी काहीच केलं नाही- मोदी

Last Updated: Wednesday, April 9, 2014, 18:48

वडोदऱ्यामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी महाराष्ट्रात दाखल झाले. सांगलीत त्यांनी जाहीर सभा घेतली. यावेळी नरेंद्र मोदींनी `सांगली बनवूया चांगली`चा नारा दिला. त्यानंतर घराणेशाहीवर सडकून टीका करत घराणेशाही विकासाला खीळ बसवत असल्याचं म्हटलंय.

पुण्यात कर्जबाजारीपणातून आई, पत्नीसह मुलीची हत्या

पुण्यात कर्जबाजारीपणातून आई, पत्नीसह मुलीची हत्या

Last Updated: Wednesday, April 9, 2014, 16:21

कर्जबाजारीपणातून तिघांची हत्या करण्यात आल्याची घटना पुण्यात घडली आहे. हडपसरमध्ये ‘एसएलके हाईट्स’ या इमारतीत राहणार्यात सागर गायकवाडनं आपली आई शकुंतला गायकवाड, पत्नी कविता गायकवाड आणि ७ वर्षांची मुलगी इशिता गायकवाड हिचा ओढणीनं गळा आवळून खून केलाय.

मोदी म्हणतात... पवारांच्या पायाखालची जमीन सरकते

मोदी म्हणतात... पवारांच्या पायाखालची जमीन सरकते

Last Updated: Wednesday, April 9, 2014, 16:10

सांगली बनवूया चांगली, अशी घोषणा करत भाजपचे सांगलीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्यासाठी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींनी मतं मागितली.

रायगडमध्ये तटकरे विरूद्ध तटकरे, घड्याळ विरुद्ध घड्याळ!

रायगडमध्ये तटकरे विरूद्ध तटकरे, घड्याळ विरुद्ध घड्याळ!

Last Updated: Wednesday, April 9, 2014, 16:51

रायगडमध्ये तटकरे विरूद्ध तटकरे अशी एक रंगतदार लढत रंगणार आहे. या मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप आणि शिवसेना अशी तिरंगी लढत रंगणार आहे. मात्र अगदी शेवटच्या क्षणाला अपक्ष म्हणून सुनील शाम तटकरे या नावाच्या व्यक्तीनंही उमेदवारी अर्ज दाखल केलाय. सुनील तटकरे यांच्याशी असलेल्या नामसाधर्म्यामुळे इथं एक वेगळीच रंगत निर्माण केलीय.