माळशेज घाट अपघात : युद्धपातळीवर मदतकार्य सुरू

माळशेज घाट अपघात : युद्धपातळीवर मदतकार्य सुरू

Last Updated: Thursday, January 2, 2014, 13:31

ठाणे आगरातून अहमदनगरच्या दिशेने निघालेल्या एसटीला गुरुवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास माळशेज घाटात भीषण अपघात झाला. एका नागमोडया वळणावर टेम्पोशी धडक टाळण्याच्या प्रयत्न करण्याच्या नादात बसवरील नियंत्रण सुटले. त्याचवेळी टेम्पोने धडक दिल्याने बस १५० फूट दरीत कोसळली. दरम्यान, एस टी अपघातातील अनेकांना वाचविण्यासाठी युद्धपातळीवर मदतकार्य सुरू आहे.

माळशेज घाटात एसटीला भीषण अपघात, २७ ठार

माळशेज घाटात एसटीला भीषण अपघात, २७ ठार

Last Updated: Friday, January 3, 2014, 07:44

माळशेज घाटात एसटी बसला भीषण अपघात झाला. टेम्पोनं धडक दिल्यानं बस दरीत कोसळल्याने या अपघातात २७ जणांचा मृत्यू झाला. तर ६ जण जखमी झाले आहेत. एसटीमध्ये ४५ प्रवासी होते. यातील ४३ जणांची ओळख पटली आहे. दरम्यान, टेम्पो चालकाला अटक करण्यात आली आहे.

काँग्रेसच्या माजी मंत्र्याकडे तब्बल सरकारी योजनेतील अकरा सदनिका

काँग्रेसच्या माजी मंत्र्याकडे तब्बल सरकारी योजनेतील अकरा सदनिका

Last Updated: Thursday, January 2, 2014, 09:47

काँग्रेसचे माजी राज्यमंत्री चंद्रकांत शिवरकर यांच्यावर गैरव्यवहाराचा आरोप होतोय. पुण्यातील एका आर्थिक मागास योजना प्रकल्पात त्यांच्या नावे एक नाही, दोन नाही तर तब्बल अकरा सदनिका असल्याचे समोर आलंय. या सदनिकांचा उल्लेख त्यांच्या पत्नी नगरसेविका कविता शिवरकर यांच्या निवडणूक शपथपत्रात देखील आहे.

पिंपरीत ‘स्पेशल ४२’ची कामगिरी, ५ सोनसाखळी चोरांना अटक

Last Updated: Wednesday, January 1, 2014, 21:45

पिंपरीत सोनसाखळी चोरांचा धुडगूस सुरू असल्यानं स्थापन करण्यात आलेल्या पोलिसांच्या ‘स्पेशल ४२’ या तपास पथकानं पाच सोनसाखळी चोरांना अटक केलीय. त्यांच्याकडून सोनसाखळी चोरीचे ४२ गुन्हे उघडकीस आले असून, ६० तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहे.

आठ वर्षांच्या चिमुरडीनं वाचविले ४ वर्षांच्या मुलीचे प्राण

आठ वर्षांच्या चिमुरडीनं वाचविले ४ वर्षांच्या मुलीचे प्राण

Last Updated: Thursday, January 2, 2014, 07:36

इंदापूर जिल्ह्याच्या लासुर्णे इथं एक शौर्याची घटना घडली. एका आठ वर्षाच्या चिमुरडीनं चार वर्षाच्या चिमुकलीचे प्राण वाचवले.

नागपुरात दोघांचा अपघातात मृत्यू, नववर्ष सेलिब्रेशनला गालबोट

नागपुरात दोघांचा अपघातात मृत्यू, नववर्ष सेलिब्रेशनला गालबोट

Last Updated: Wednesday, January 1, 2014, 16:42

नववर्षाच्या स्वागाताचा सर्वत्र जल्लोष सुरु असतानाच नागपुरात मात्र या सेलिब्रेशनला गालबोट लागले. नवा वर्षाच्या जल्लोषा दरम्यान मध्यरात्री झालेल्या दोन रस्ते अपघातात तिघांचा मृत्यू झाला.

औरंगाबादमध्ये चंद्रकांत खैरे - संजय केनेकर यांच्यात राडा

औरंगाबादमध्ये चंद्रकांत खैरे - संजय केनेकर यांच्यात राडा

Last Updated: Wednesday, January 1, 2014, 15:56

शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे आणि भाजपचे गटनेते संजय केनेकर ३१ डिसेंबरला आमनेसामने आले. यानंतर दोघांमध्ये बाचाबाची झाल्याने जोरदार राडा झाला. हे दोन्ही नेते भिडल्याने दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याचे पाहायला मिळाले.

खुशखबर : ‘एसटी’मध्ये नोकरीची संधी!

Last Updated: Wednesday, January 1, 2014, 11:41

नवीन वर्षात एसटी महामंडळानं एक खुशखबर दिलीय. आत्तापर्यंत एकदा नोकरभरती झाली की पुढचे चार-पाच वर्ष स्थगित राहणारी नोकरभरती यंदाच्या वर्षापासून दरवर्षी आणि तेही नियमितपणे होणार असल्याचं एसटी महामंडळानं स्पष्ट केलंय.

धक्कादायक: तिसरीही मुलगी झाली म्हणून विवाहितेला जाळलं

धक्कादायक: तिसरीही मुलगी झाली म्हणून विवाहितेला जाळलं

Last Updated: Tuesday, December 31, 2013, 18:42

पुरोगामी महाराष्ट्रात रोज नवनवीन धक्कादायक घटना घडतायेत. नागपूरात असाच एक गंभीर प्रकार घडलाय. तिसरीही मुलगीच जन्मली म्हणून संतापलेल्या सासू-सासर्‍यानं आपल्या सुनेचा जाळून खून केल्याची खळबळजनक घटना कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवनगर इथं घडली. दरम्यान, पोलिसांनी या दोघांनाही अटक केलीय.

<B> <font color=#0404B4>व्हिडिओ:</font></b> हा बघा राष्ट्रवादीला आलेला पैशांचा माज

व्हिडिओ: हा बघा राष्ट्रवादीला आलेला पैशांचा माज

Last Updated: Tuesday, December 31, 2013, 17:36

धुळ्याच्या महापालिका निवडणुकीनंतर लोकशाहीची थट्टा पाहायला मिळालीये. महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा पैशांची शब्दशः उधळपट्टी केलीये... नवनिर्वाचित उपमहापौर फारुख शहा यांच्या मिरवणुकीत कार्यकर्त्यांनी हा पैशांचा माज दाखवला...