राज ठाकरेंच्या घरासमोर ‘चिटपाखरू’ नाही

राज ठाकरेंच्या घरासमोर ‘चिटपाखरू’ नाही

Last Updated: Tuesday, May 20, 2014, 19:13

निवडणुका म्हटलं की जिथे प्रचंड लगबग असायची..... कार्यकर्त्यांची गर्दी, प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची व्हिज्युअल्स घेण्याची धडपड सुरू असायची..... कुणीही नेता त्या भागाच्या आसपास जरी फिरकला तरी ब्रेकिंग न्यूज व्हायची..... आता तिथं सारं काही शांत आहे..... आम्ही बोलतोय कृष्णकुंजबद्दल...... पाहुयात सध्या कृष्णकुंजवर काय सुरू आहे.....

आयसीआयसीआय बँकेकडून `गूड न्यूज`

आयसीआयसीआय बँकेकडून `गूड न्यूज`

Last Updated: Tuesday, May 20, 2014, 17:26

आयसीआयसीआय बँकेकडून ज्या लोकांनी गृह कर्ज घेतलं आहे, त्यांच्यासाठी खूश खबर. आयसीआयसीआय बँकेने गृह कर्जाच्या व्याज दरात ०.१० टक्कयांची कमतरता केली आहे. बँक आता महिलांनादेखील एडिशनल डिकाउंट देत आहेत.

`झी 24 तास`ची मोहीम : गंगाजल... माय प्राईड

Last Updated: Tuesday, May 20, 2014, 16:23

गंगा... आपल्यासाठी ही केवळ एक नदी नाही... तर गंगा ही आपली सभ्यता आहे, संस्कृती आहे... गंगा आणि आपल्या संस्काराचं अतूट नातं जोडलं गेलंय.

लोकसभा पराभवानंतर मनसेची आज चिंतन बैठक

Last Updated: Tuesday, May 20, 2014, 09:26

मनसेची आज चिंतन बैठक होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर ही बैठक बोलावण्यात आली आहे. सकाळी ११ वाजता दादरच्या राजगडावर बैठक होणार आहे.

पेण अर्बन बँक दिवाळखोरीला कोर्टाची स्थगिती

Last Updated: Tuesday, May 20, 2014, 08:03

पेण अर्बन बँक दिवाळखोर काढू नये, यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने स्थिगिती दिली आहे. बॅंकेने न्यायालयात धाव घेतली असता उच्च न्यायालयाने अंतरिम स्थिगती दिलेय. त्यामुळे जवळपास १ लाख ठेवीदारांना दिलासा मिळाला आहे.

मोदींसाठी मुंबई विद्यापीठाचे संकेतस्थळ हॅक

मोदींसाठी मुंबई विद्यापीठाचे संकेतस्थळ हॅक

Last Updated: Monday, May 19, 2014, 21:12

मुंबई विद्यापीठाचे संकेतस्थळ पाकिस्तानी हॅकर्सनी हॅक केलं होत. संकेतस्थळावर देशाचे भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी देणारा मजकूर अपलोड करण्यात आला होता.

बहिणीला भेटण्यासाठी मुंबईत आली, एअरपोर्टवरून बेपत्ता

बहिणीला भेटण्यासाठी मुंबईत आली, एअरपोर्टवरून बेपत्ता

Last Updated: Monday, May 19, 2014, 17:08

बहिणीला भेटण्यासाठी मुंबईत आलेली एक महिला एअरपोर्टवरून अचानक बेपत्ता झाल्याचा प्रकार घडलाय. नवी दिल्लीच्या गीता कॉलनीत राहणारी एक महिला ही महिला आहे. ही घटना 13 मेची आहे. गीता कॉलनी पोलीस स्टेशनमध्ये यासंदर्भात तक्रार नोंदवण्यात आलीय. मुंबईत याप्रकरणी तपास सुरू झालाय.

युतीला राज ठाकरेंची मदत, मनसेची मतं युतीच्या पारड्यात

युतीला राज ठाकरेंची मदत, मनसेची मतं युतीच्या पारड्यात

Last Updated: Monday, May 19, 2014, 12:34

लोकसभा निवडणूक 2014 अनेक कारणांनी ऐतिहासिक ठरतेय. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपनं मारलेली मुसंडी तर आहेच. सोबतच गेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेला भरभरून मतदान करणाऱ्या मतदारांनी यावेळी मनसेला केवळ नाकारलंच नाही तर आपली मतं शिवसेना-भाजपच्या उमेदवारांना दिल्याचं मतदानाच्या आकडेवारीवरून स्पष्टपणे दिसत आहे.

अच्छे दिन... रूपयानं गाठला अकरा महिन्यातील उच्चांक!

अच्छे दिन... रूपयानं गाठला अकरा महिन्यातील उच्चांक!

Last Updated: Monday, May 19, 2014, 11:21

नव्या सरकारचा प्रभाव पहिल्या आठवड्यात कायम आहे. सेन्सेक्सनं बाजार उघडताच 300 अंकांची उसळी घेतली तर निफ्टीमध्ये 80 अंशांची वाढ झालीय.

आठवलेंचा मंत्रिपदाचा निर्णय मोदी घेतील

आठवलेंचा मंत्रिपदाचा निर्णय मोदी घेतील

Last Updated: Sunday, May 18, 2014, 23:18

आरपीआय नेते आणि महायुतीचे सदस्य रामदास आठवले यांनी आज सकाळी राजनाथ सिंह यांची भेट घेतली. या भेटीत आठवलेंनी कॅबिनेट मंत्रीपदाची मागणी केलीय.