राज्यात अनेक भागात पाऊस

राज्यात अनेक भागात पाऊस

Last Updated: Tuesday, January 21, 2014, 20:51

गेल्या काही दिवसांपासून राज्यात जाणवणारा थंडीचा कडाका अचानक कमी झालाय.आज सकाळी राज्याच्या अनेक भागात पाऊस झाला. यामुळे किमान तापमनामध्ये सरासरीच्या तुलनेत वाढ झाल्याचं चित्र आहे.

मुंबईत पावसाचा शिडकावा

Last Updated: Tuesday, January 21, 2014, 10:20

मुंबईत गेली दोन ते तीन दिवस थंडी होती. मात्र, आज सकाळी मुंबईसह उपनगरात पावसाच्या हलक्या सरी पडल्यात. ढगाळ वातावरण आणि पाऊस यामुळे मुंबईतील थंडी गायब झाली आहे.

मोनोरेल लवकरच मुंबईकरांच्या सेवेत, सुरक्षा प्रमाणपत्र मिळाले

Last Updated: Tuesday, January 21, 2014, 09:45

मुंबई कधी धावणार मोनो, असा प्रश्न आता विचारला जाणार नाही. कारण ही मोनोरेल लवकरच मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. मोनरेलचे आवश्यक असणारे एमएमआरडीला सुरक्षा प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यामुळे मोनोरेल धावण्यासाठी सज्ज झाली आहे. मोनोचा पहिला प्रवास हा चेंबूर-वडाळा असणार आहे.

निवडणुकीच्या तोंडावर सरकारच्या डोळ्यासमोर ‘वीज चमकली’

निवडणुकीच्या तोंडावर सरकारच्या डोळ्यासमोर ‘वीज चमकली’

Last Updated: Monday, January 20, 2014, 17:57

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. घरगुती, कृषी, उद्योग आणि वाणिज्य क्षेत्रातल्या ग्रहकांना याचा फायदा होणार आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या मालमत्तेचा वाद चव्हाट्यावर

बाळासाहेब ठाकरे यांच्या मालमत्तेचा वाद चव्हाट्यावर

Last Updated: Monday, January 20, 2014, 11:56

बाळासाहेब ठाकरे यांच्या मालमत्तेचा वाद चव्हाट्यावर आलाय. बाळासाहेबांचे द्वितीय पुत्र जयदेव ठाकरे यांनी बाळासाहेंबाच्या मृत्यूपत्रावर आक्षेप नोंदवलाय.

मोदी आणि लता मंगेशकरांच्या उपस्थितीत `ऐ मेरे वतन के लोगों`

मोदी आणि लता मंगेशकरांच्या उपस्थितीत `ऐ मेरे वतन के लोगों`

Last Updated: Sunday, January 19, 2014, 21:46

गान कोकिळा लता मंगेशकर यांनी गायलेलं आणि कवी प्रदीप यांनी लिहिलेलं `ऐ मेरे वतन के लोगों` या गीताला ५० वर्ष पूर्ण होत आहेत.

यंदाही मुंबई मॅरेथॉनवर केनियन धावपटूंचं वर्चस्व

यंदाही मुंबई मॅरेथॉनवर केनियन धावपटूंचं वर्चस्व

Last Updated: Sunday, January 19, 2014, 15:29

‘रन मुंबई रन’चा नारा देत मुंबई मॅरेथॉन मोठ्या उत्साहात पार पडली. लहानग्यांपासून तर अगदी ७० वर्षांच्या वयोवृद्धांपर्यंत सर्वांनी मॅरेथॉनमध्ये उत्साहात सहभाग घेतला. मुंबईकर मोठ्या जोशात आणि जल्लोषात मॅरेथॉनमध्ये धावताना दिसले.

सचिनच्या साराची सामाजिक बांधिलकी!

सचिनच्या साराची सामाजिक बांधिलकी!

Last Updated: Sunday, January 19, 2014, 09:33

सचिन तेंडुलकरची सासू आणि अपनालया या सामाजिक संस्थेद्वारे सामाजिक कार्य करणाऱ्या ऍनाबेल मेहता दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी झाल्यात. सोबतच `मॅरेथॉनमध्ये यावर्षी पहिल्यांदाच भाग घेत असून एका सामाजिक प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी मी धावणार आहे.` हे उद्गार आहेत सारा सचिन तेंडुलकर हिचे!

‘रन मुंबई रन’... गुलाबी थंडीत रंगतेय मुंबई मॅरेथॉन!

‘रन मुंबई रन’... गुलाबी थंडीत रंगतेय मुंबई मॅरेथॉन!

Last Updated: Sunday, January 19, 2014, 08:53

रन मुंबई रन चा नारा देत मुंबई मॅरेथॉनला मोठ्या उत्साहात सुरुवात झालीय. हजारो मुंबईकरच नव्हे तर देश-विदेशातून आलेल्या धावपंटूंनी मॅरेथॉनमध्ये भाग घेतलाय.

माझ्या विरोधात षडयंत्र रचलं जातंय - घोसाळकर

Last Updated: Saturday, January 18, 2014, 20:41

नगरसेविका शितल म्हात्रे यांच्या तक्रारीवरुन अडचणीत आलेले शिवसेनेचे आमदार विनोद घोसाळकर यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळलेत.