Last Updated: Wednesday, January 22, 2014, 07:48
शीतल म्हात्रे प्रकरणी मुंबई महापालिकेत शिवसेनेची कोंडी विरोधकांनी केली. विरोधकांच्या गोंधळात सभागृह तिसर्यांदा गुंडाळले गेले. यावेळी विरोधकांनी गटनेत्यांच्या बैठकीवर बहिष्कार घातला. गोंधळ घातल्याने विरोधी पक्षाच्या पाच सदस्यांवर निलंबनाची कारवाई करीत महापौर सुनील प्रभू यांनी मनमानी कारभार सुरू ठेवला. तसा आरोप विरोधकांनी केलाय.