लतादीदी `ए मेरे वतन ` गीत गाणार नाहीत?

लतादीदी `ए मेरे वतन ` गीत गाणार नाहीत?

Last Updated: Monday, January 27, 2014, 18:29

मुंबईत आज संध्याकाळी महालक्ष्मी रेसकोर्सवर `ए मेरे वतन के लोगो ` हा  भव्यदिव्य कार्यक्रम होतोयं. सुमारे एक लाखापेक्षा जास्त नागरीक `ए मेरे वतन के लोगो `  हे गीत गाणार आहेत.

चूक असल्यास कारवाई होणार- गृहमंत्रालय

चूक असल्यास कारवाई होणार- गृहमंत्रालय

Last Updated: Monday, January 27, 2014, 15:24

राज ठाकरेंच्या कालच्या नवी मुंबईतल्या भाषणाची चौकशी होणार आहे. या भाषणात चिथावणीखोर वक्तव्य आढळल्यास कारवाई करणार असल्याची माहिती गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी दिली आहे. त्यामुळं आता राज ठाकरेंच्या भाषणाची सीडी तपासली जाणार असल्याचं समजतंय.

आधी टोलवसुली, आता विरोध - भुजबळ

आधी टोलवसुली, आता विरोध - भुजबळ

Last Updated: Monday, January 27, 2014, 14:47

शिवनसेनेत असताना ज्यांनी टोलवसुलीला सुरूवात केली तेच आता टोलला विरोध करत आहेत, असा टोला आज राज ठाकरे यांना सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी लगावला. टोल बंद झाले तर सरकारकडे निधी आल्यावरच रस्त्याची कामं करावी लागतील, असंही भुजबळ यांनी म्हटलंय.

रेसकोर्सवर घुमणार लतादीदींचे स्वर!

रेसकोर्सवर घुमणार लतादीदींचे स्वर!

Last Updated: Monday, January 27, 2014, 14:40

मुंबईत आज महालक्ष्मी रेसकोर्सवर `ए मेरे वतन के लोगो` हा भव्यदिव्य कार्यक्रम होत आहे. सुमारे एक लाखापेक्षा जास्त नागरीक `ए मेरे वतन के लोगो` हे गीत गाणार आहेत. गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर आणि नरेंद्र मोदी ह्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होत आहे. सोबतच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेसुध्दा यावेळी उपस्थिती लावणार आहेत.

मुख्यमंत्र्यांचे आश्वासन; निरुपमांचे उपोषण मागे

मुख्यमंत्र्यांचे आश्वासन; निरुपमांचे उपोषण मागे

Last Updated: Monday, January 27, 2014, 14:41

काँग्रेस खासदार संजय निरुपम यांनी मुंबईतल्या वीज दराच्या कपातीच्या मुद्यावर सुरु असलेलं उपोषण अखेर मागे घेतलंय. मुख्यमंत्र्यांनी वीज दर कपातीबाबत आश्वासन दिल्यानंतर निरुपम यांनी आपलं उपोषण मागे घेतलंय.

काँग्रेस राज्यसभेचे उमेदवार जाहीर

Last Updated: Sunday, January 26, 2014, 22:25

राष्ट्रवादी आणि भाजपने आपले राज्यसभेचे उमेदवार जाहीर केल्यानंतर आज काँग्रेसने आपले राज्यसभेचे उमेदवार जाहीर केलेत. काँग्रेसने आधीच्याच उमेदवारांना उमेदवारी दिला आहे.

राज्यातील ४४ पोलिसांना राष्ट्रपती पोलीस पदक

राज्यातील ४४ पोलिसांना राष्ट्रपती पोलीस पदक

Last Updated: Sunday, January 26, 2014, 16:09

राज्य पोलीस दलातील ४० अधिकार्‍यांना राष्ट्रपती पोलीस विशेष गुणवत्ता व पोलीस उल्लेखनीय सेवा पदक पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला गृह मंत्रालयाकडून हे पुरस्कार जाहीर करण्यात आले होते.

इमारतीच्या सुरक्षा रक्षकानं केला तरुणीवर बलात्कार

Last Updated: Sunday, January 26, 2014, 15:36

दारूच्या नशेनं एका तरुणीचा घात केला. तिच्या नशेचा फायदा घेत सुरक्षारक्षकानंच तिच्यावर बलात्कार केल्याची घटना पवई इथं घडलीय. ही तरुणी इतक्या नशेत होती की तिला इमारतीत परतल्यानंतर पुढं काय घडलं यातलं काहीच आठवत नाही. ज्यानं अत्याचार केला तो सुरक्षारक्षकच होता हेही ती ठामपणे सांगू शकत नाही, अशी माहिती पोलिसांनी दिलीय.

निरुपम यांचं उपोषण सुटणार, वीजदराबाबत निर्णय?

निरुपम यांचं उपोषण सुटणार, वीजदराबाबत निर्णय?

Last Updated: Sunday, January 26, 2014, 14:08

काँग्रेसचे खासदार संजय निरूपम यांचं वीजदराबाबतचं उपोषण सुरू आहे. या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. निरूपम यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात एक अत्यंत महत्त्वाची बैठक झाली.

यंदा पहिल्यांदाच `मरिन ड्राईव्ह`चं झालं `राजपथ`!

यंदा पहिल्यांदाच `मरिन ड्राईव्ह`चं झालं `राजपथ`!

Last Updated: Sunday, January 26, 2014, 13:48

मुंबईतल्या मरिन ड्राईव्हवर पहिल्यांदाच प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम सोहळा रंगला. या सोहळ्यात आकर्षक २५ चित्ररथ, व्हिंटेज कार रॅली, मोटारसायकल स्वारांची साहसी प्रात्याक्षिकं सादर करण्यात आली.