Last Updated: Monday, January 13, 2014, 15:04
नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपण आम आदमी पक्षाला संपूर्ण सहकार्य करणार असल्याचं जाहीर केलंय. त्यांनी पक्ष प्रवेश केला नसला तरी संपूर्ण प्रक्रियेत ‘आप’ला पाठिंबा असल्याचं त्या म्हणाल्या. शिवाय आम आदमी पक्षासोबत आणखी चर्चा सुरू असून १६ आणि १७ जानेवारीला होणाऱ्या बैठकीत अधिक चर्चा होऊन निर्णय सांगणार असल्याचंही मेधा पाटकर म्हणाल्या.