सीए परीक्षेत अकोल्याचा गौरव श्रावगी देशात पहिला

सीए परीक्षेत अकोल्याचा गौरव श्रावगी देशात पहिला

Last Updated: Wednesday, January 15, 2014, 17:13

सीए परीक्षेचा निकाल जाहीर झालाय. महाराष्ट्राचा गौरव दीपक श्रावगी देशात पहिला आलाय. त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. `बोले तो ऑल इंडिया में टॉप किया अपून ने`, अशी प्रतिक्रिया गौरवने फेसबुकवर पोस्ट केली आहे.

प्रा. हातेकर यांच्या निलंबन विरोधातील आंदोलन मागे

प्रा. हातेकर यांच्या निलंबन विरोधातील आंदोलन मागे

Last Updated: Wednesday, January 8, 2014, 22:41

मुंबई विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागाचे प्राध्यपक नीरज हातेकर यांच्या निलंबनाच्या विरोधात या विभागातील विद्यार्थ्यांनी सुरु केलेलं आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आलंय.

बरं का, अख्यं सोलरचं घर उभ राहतंय, दोन विद्यार्थ्यांचा प्रयत्न

Last Updated: Thursday, January 2, 2014, 09:47

पॅरिसमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सोलर स्पर्धेत आयआयटी पवई आणि रचना संसदमधल्या विद्यार्थ्यांची निवड झालीय. ७० जणांची ही `टीम शून्य` सोलर पॅनलचं अख्खच्या अख्खं घर त्यासाठी साकारत आहेत.

शाळांची फी येत्या शैक्षणिक वर्षात वाढण्याची शक्यता

शाळांची फी येत्या शैक्षणिक वर्षात वाढण्याची शक्यता

Last Updated: Friday, December 27, 2013, 12:09

शिक्षण हक्क कायद्यानुसार आता शाळांना वर्षाला १८० दिवसांऐवजी २२० दिवस करावे लागणार आहेत. त्यामुळं मात्र स्कूल बस असोसिएशन फी वाढवण्याच्या विचारात आहे. त्याचप्रमाणे शाळासुद्धा येत्या शैक्षणिक वर्षात फी वाढवण्याच्या विचारात आहेत.

खबरदार...शैक्षणिक इमारती ३०मिटरपेक्षा उंच नकोत!

खबरदार...शैक्षणिक इमारती ३०मिटरपेक्षा उंच नकोत!

Last Updated: Wednesday, December 25, 2013, 10:28

महाराष्ट्र फायर प्रिवेंशन अक्टनुसार कोणत्याही शैक्षणिक संस्थांना आता आपल्या शैक्षणिक इमारती ३०मिटरपेक्षा अधिक उंचीच्या करता येणार नसल्याने त्याचा फटका महाविद्यालयांना बसायला सुरुवात झालीय. विद्यार्थ्यांची वाढती संख्या पाहता नविन विद्यार्थ्यांना मुंबईत कुठून जागा आणायची असा प्रश्न निर्माण झालाय.

`मनविसे`चा युवा सेनेला दणका, कॉलेज निवडणुकीत बाजी

Last Updated: Thursday, December 12, 2013, 09:43

मुंबईत मनसे आणि शिवसेना यांच्यातील राजकीय चढाओढ दिसून येत आहे. हीच चढाओढ आता महाविद्यालयात दिसून येत आहे. यंदा महाविद्यालयीन निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने युवा सेनेवर बाजी मारली आहे.

मुंबई विद्यापीठात आता मार्कांचा नवा घोळ

मुंबई विद्यापीठात आता मार्कांचा नवा घोळ

Last Updated: Thursday, December 5, 2013, 19:12

नवनव्या वादांना जन्म देणा-या मुंबई विद्यापीठात आता मार्कांचा नवा घोळ घातला गेलाय. ६० मार्कांची लेखी आणि ४० मार्कांच्या इंटरनल परीक्षेत मिळालेल्या गुणांमध्ये तफावत आढळल्यास इंटरनलचे मार्क कमी करण्याची नवी पद्धत विद्यापीठानं सुरू केलीये. याचा शेकडो विद्यार्थ्यांना फटका बसणार आहे.

पुण्यातील स.प. महाविद्यालयाला दणका, मान्यताच रद्द

Last Updated: Thursday, November 28, 2013, 09:27

पुण्यातील एस.पी. महाविद्यालयाची मान्यता रद्द करण्यात आल्याने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या महाविद्यालयाने बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज न स्विकारल्याने राज्याच्या उच्च माध्यमिक महामंडळाने नियमाला फाटा दिल्याच्या कारणाने जोदरार झटका दिलाय.

शाळेची प्रवेश प्रक्रिया एप्रिल- मे मध्येच

शाळेची प्रवेश प्रक्रिया एप्रिल- मे मध्येच

Last Updated: Friday, November 22, 2013, 23:43

समस्त पालकांसाठी महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी. मुलांच्या प्रवेशासाठी कडाक्याच्या थंडीत शाळेच्या बाहेर रात्र- रात्र रांगा लावण्याची पालकांची फरफट आता थांबणार आहे. पूर्व प्राथमिक तसंच पहिलीच्या वर्गासाठी नोव्हेंबरमध्येच देण्यात आलेले प्रवेश बेकायदा ठरणार आहेत. शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वी फक्त महिनाभर आधी म्हणजे एप्रिल- मे मध्येच शाळेची प्रवेश प्रक्रिया राबवण्याचे आदेश राज्यातल्या सगळ्या शाळांना देण्यात आले आहेत.

‘स्कूलबस’चा नवा ‘जीआर’; शिक्षणमंत्र्यांना पत्ताच नाही!

Last Updated: Wednesday, November 20, 2013, 19:05

स्कूलबसबाबत काढलेल्या ‘जीआर’बाबत शालेय शिक्षण खात्यातला आणखी एक गोंधळ समोर आलाय. ही फाईल आपल्यासमोर आलेलीच नाही, असा अजब दावा शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी केलाय.