वयात होते वाढ, तशी झोप लागते गाढ

Last Updated: Friday, March 2, 2012, 16:39

आत्तापर्यंत असं मानलं जात होतं की जसजसं माणसाचं वय वाढतं, तसतशी त्याची भूक, झोप कमी होते. पण, नुकत्याच एका संशोधनातून समोर आलं आहे की वाढत्या वयानुसार झोपही वाढू लागते आणि अधिक शांत झोप लागते.

कागद-पेन घ्या, वजन कमी करा

Last Updated: Thursday, January 12, 2012, 18:14

कॅनडाच्या वॉटरलू विश्वविद्यालयाने असा दावा केला आहे की ज्या स्त्रिया आपल्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या मूल्यांबद्दल लिखाण करतात, त्यांचं वजन घटण्याची शक्यता जास्त असते.

शॉपिंग बॅगही बिघडवू शकते मनःस्वास्थ्य!

Last Updated: Wednesday, January 4, 2012, 21:50

जड शॉपिंग बॅगांइतकी साधी गोष्टही आपला मानसिक तणाव वाढवू शकते. नुकत्याच एका संशोधनातून हे सिद्ध झालं आहे. हातातील भौतिक वजन माणसाच्या मनःस्वास्थ्यावर परिणाम करत असते.

'बेबी ब्रेन सिंड्रोम' देतो चांगलं मातृत्व

Last Updated: Sunday, January 1, 2012, 10:30

गर्भवती महिलांबद्दल असं म्हटलं जातं की त्यांच्या गोष्टी लक्षात राहात नाहीत किंवा लक्षात ठेवलेल्या गोष्टी लगेच विसरायला होतात. पण, नुकत्याच एका संशोधनातून असा दावा करण्यात आला आहे की हा 'बेबी ब्रेन सिंड्रोम' आहे.

व्हिटामिनने होतो गर्भधारणेत फायदा

Last Updated: Saturday, December 24, 2011, 20:31

एका नव्या अभ्यासातून सिद्ध झालंय की स्त्रियांना व्हटामिनच्या सेवनामुळे गर्भधारणेसाठी फायदा होऊ शकतो. ज्या स्त्रियांनी गर्भधारणेशी संबंधित व्हिटामिनच्या गोळ्या घेतल्या त्या स्त्रियांच्या गर्भधारणेची शक्यता गोळ्या न घेणाऱ्या स्त्रियांपेक्षा दुप्पट वाढली.

गर्भलिंग चाचणी फक्त संस्था किंवा हॉस्पिटलमध्येच

Last Updated: Friday, November 18, 2011, 05:57

गर्भलिंग निदान चाचणी आणि त्यानंतर होणारे गर्भपात ही अत्यंत क्लेशकारक घटना आहे. यामुळेच आता गर्भलिंग निदान चाचणीसाठी हायकोर्टाने काही प्रमाणात पायबंद घालण्यास सुरवात केली आहे.गर्भलिंग निदान चाचण्या रोखण्याच्या प्रयत्नांना बळ देणारा आणखी एक निर्णय मुंबई हायकोर्टानं दिला.

गर्भवती स्त्रीचे आरोग्य व सौंदर्य

Last Updated: Saturday, December 31, 2011, 17:25

गर्भवती स्त्रियांना केवळ आपल्याच आरोग्याची काळजी घ्यायची नसते तर आपल्या पोटात वाढणाऱ्या बाळाचंही संगोपन करायचं असतं.पण, त्याच बरोबर आजच्या महिलांना आपलं सौंदर्य याकाळातही टिकवायचं असतं.

काळजी घ्या... प्रसुतीनंतरची

Last Updated: Thursday, November 17, 2011, 16:23

स्त्रीला बाळाला जन्म देणं म्हणजे तिचा आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे. त्यामुळेच प्रसुतीनंतर प्रत्येक स्त्रीने आपल्या शरीराची काळजी घेणं आवश्यक आहे. कारण की प्रसुतीनंतर लगेचच गर्भाशय आणि आजूबाजूच्या भागामध्ये विषाणूसंसर्ग होऊ शकतो.

धूम्रपानामुळे लवकर येतो मेनोपॉझ!

Last Updated: Thursday, November 17, 2011, 15:49

सिगरेट ओढण्यामुळे मेनोपॉझ एक वर्ष आधीच येऊ शकतो.सिगरेट पिण्यामुळे हाडांच्या आणि हृदयाच्या विकारांव्यतिरिक्त महिलांची मासिक पाळीही वेळेआधीच बंद होऊ शकते. असं मत डेली मेलने नोंदवलं आहे.