विमानातील सॅण्डविचमध्ये अळ्या

विमानातील सॅण्डविचमध्ये अळ्या

Last Updated: Tuesday, October 15, 2013, 18:19

न्यू यॉर्कहून नवी दिल्लीकडे उड्डाण करणाऱ्या विमानात प्रवासादरम्यान दिलेल्या जेवणात एका प्रवाशाला सॅण्डविचमध्ये आळ्या आढळून आल्या आहेत.

`अल्ला... हा शब्द मुस्लिमांसाठी; इतरांनी तो वापरू नये`

`अल्ला... हा शब्द मुस्लिमांसाठी; इतरांनी तो वापरू नये`

Last Updated: Tuesday, October 15, 2013, 16:58

‘अल्ला’ हा शब्द फक्त मुस्लिमांसाठीच आहे इतर धर्मियांना तो वापरता येणार नाही, असा धक्कादायक निकाल मलेशियातील एका कोर्टानं दिलाय. महत्त्वाचं म्हणजे, हा निकाल देणारे कोर्टाचे तीन जजही मुस्लिम धर्मीयच आहेत.

शनी, गुरू या ग्रहांवर हिऱ्यांचा पाऊस

Last Updated: Tuesday, October 15, 2013, 14:58

तुम्ही गारांचा पाऊस, अॅसिड रेन, लाल पाऊस, पिवळा पाऊस पाहिला असेल किंवा ऐकला असेल. मात्र, आता ग्रहांवर पाऊस पडणार आहे. तोही गारांचा नाही तर चक्क हिऱ्यांचा असणार आहे. हिऱ्यांच्या पावसाचा दावा अमेरिकेच्या वैज्ञानिकांनी केला आहे.

२०३० सालापर्यंत जगावर जलसंकट कोसळणार!

२०३० सालापर्यंत जगावर जलसंकट कोसळणार!

Last Updated: Tuesday, October 15, 2013, 13:38

आत्ताच योग्य ती पावलं न उचलल्यास २०३० सालापर्यंत लोकसंख्येला पुरेसं पाणी पृथ्वीतलावर शिल्लक राहाणार नाही, असा इशारा संयुक्त राष्ट्रांचे महासचिव बान की-मून यांनी दिला आहे. २०३० सालापासून फार मोठं जलसंकट उभं राहाणार आहे.

फिलीपिन्स भूकंपानं हादरलं, 20 जणांचा मृत्यू

फिलीपिन्स भूकंपानं हादरलं, 20 जणांचा मृत्यू

Last Updated: Tuesday, October 15, 2013, 13:25

आज सकाळी मध्य फिलीपिन्स भूकंपानं हादरला. 7.2 तीव्रतेच्या भूकंपात आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाल्याचं कळतंय. तर अनेक इमारतींना आणि रस्त्यांना भूकंपामुळं भेगा पडल्या आहेत. संपूर्ण परिसरात भूकंपाचे झटके अनुभवले गेले. भीतीमुळं लोक आपल्या घरांमधून बाहेर पडले. आज राष्ट्रीय सुट्टीमुळं अनेक शाळा आणि कार्यालय बंद होती, म्हणून अनेकांचे प्राण वाचले.

लॉस एंजिलिसच्या विमानतळावर ड्राय आईसचा स्फोट

लॉस एंजिलिसच्या विमानतळावर ड्राय आईसचा स्फोट

Last Updated: Monday, October 14, 2013, 20:13

ड्राय आईसच्या एका प्लॅस्टिकच्या बाटलीचा स्फोट झाल्यानं आज लॉस एंजिलिसच्या चार विमानांचं उड्डाणं रद्द करावं लागलं. आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतुकीमध्ये असा प्रकार पहिल्यांदाच घडलाय.

मला पाकिस्तानचा गर्व, लढाई शिक्षणासाठीच- मलाला

मला पाकिस्तानचा गर्व, लढाई शिक्षणासाठीच- मलाला

Last Updated: Monday, October 14, 2013, 17:30

मी पाकिस्तानची मुलगी असून मला पाकिस्तानी असण्याचा गर्व आहे, असे उद्धगार काढलेत ते युसफजाई मलालानं...

`अल्ला` शब्द मुस्लिमांखेरीज कुणी वापरायचा नाही!

`अल्ला` शब्द मुस्लिमांखेरीज कुणी वापरायचा नाही!

Last Updated: Monday, October 14, 2013, 15:53

‘अल्ला’ हा शब्द मुस्लिमांखेरीज अन्य कुणी वापरू नये, असा निकाल मलेशियामधील न्यायालयाने दिला आहे. २००९ मधील स्थानिक न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार येथील हेराल्ड या ख्रिश्चन वर्तमानपत्राने अल्ला शब्द वापरण्यास परवानगी देण्यात आली होती.

ऑस्ट्रेलियात २ भारतीयांना बलात्कार प्रकरणी अटक

ऑस्ट्रेलियात २ भारतीयांना बलात्कार प्रकरणी अटक

Last Updated: Monday, October 14, 2013, 13:05

‘टॅंगो चॅट` या मोबाईल ऍप्लिकेशनच्या माध्यमातून महिलेशी ओळख वाढवून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी २ भारतीयांना ऑस्ट्रेलियात अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे. अजितपालसिंग (३१) आणि रणधीरसिंग (२१) ही अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

‘ओपीसीडब्ल्यू’ला नोबल शांतता पुरस्कार घोषीत

‘ओपीसीडब्ल्यू’ला नोबल शांतता पुरस्कार घोषीत

Last Updated: Friday, October 11, 2013, 16:47

सर्वांना उत्सुकता लागलेलं यंदाचे शांततेचा नोबेल पुरस्कार ‘ओपीसीडब्ल्यू’ (Organisation for the Prohibition of Chemical Weapons) अर्थात ‘रासायनिक शस्त्रविरोधी संघटने’ला मिळालाय.