Last Updated: Tuesday, October 29, 2013, 13:13
जगातील सर्वात उंच माणूस विवाहाच्या बंधनात अडकलाय. गिनीज बुकमध्ये सर्वात उंच माणूस असा रेकॉर्ड असलेला तुर्कीस्तानचा सुल्तान कोसेन यानं आपली प्रेयसी मेरवे डीबो हिच्याशी लग्न केलंय. ३० वर्षाच्या सुल्तानची उंटी ८ फूट ३ इंच असून २० वर्षाची मेरवेची उंची अवघी ५ फूट ८ इंच आहे.
Last Updated: Sunday, October 27, 2013, 17:30
आपल्यालाही पुरुषांप्रमाणेच ड्रायव्हिंगचा हक्क मिळावा, यासाठी सौदी अरेबियाच्या महिला रस्त्यावर उतरल्या आहेत. सौदी अरेबियात महिलांच्या ड्रायव्हिंगवर बंदी असल्यामुळे त्याविरोधात हे आंदोलन छेडण्यात आलं आहे.
Last Updated: Friday, October 25, 2013, 19:10
निसर्गात आपल्याला अद्भूत चमत्कार पाहायला मिळतात, असाच एक चमत्कार पाकिस्तानात झाला आहे. पाकिस्तानाच्या नैऋत्याला असलेल्या सुपर मॉमने एक नाही दोन नाही तर तब्बल पाच मुलांना जन्म दिला आहे. यात तीन मुली आणि दोन मुलांचा समावेश आहे.
Last Updated: Thursday, October 24, 2013, 14:58
चीन आणि भारतादरम्यान असलेल्या सीमावादावर लवकरात लवकर तोडगा काढला पाहिजे, असं पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी म्हटलं आहे. सध्या चीनच्या दौ-यावर असलेल्या पंतप्रधानांनी कम्युनिस्ट पार्टीच्या सेंट्रल पार्टी स्कूलमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
Last Updated: Thursday, October 24, 2013, 15:18
अतिरेक्यांना आश्रय देण्याच्या मुद्द्यावरून अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची चांगलीच कानऊघडणी केली आहे.
Last Updated: Thursday, October 24, 2013, 16:39
सोनं का झाडाला लागतं का?, असं उपहासात्मक वाक्य आपल्यापैकी प्रत्येकाच्या तोंडून कधी ना कधी निघालंच असेल. मात्र हो खरंच झाडाला सोनं लागलंय. ऑस्ट्रेलिया सोन्याची झाडं उगवली आहेत, असं म्हणण्याची वेळ आलीय.
Last Updated: Wednesday, October 23, 2013, 10:35
पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग सध्या रशिया आणि चीनच्या दौ-यावर आहेत. रशियातून काल चीनमध्ये दाखल झालेत. चीनमध्ये आज ते अध्यक्ष क्सी जिनपिंग यांच्याशी आणि पंतप्रधान ली कियांग यांची भेट घेणार आहेत. सीमा सहकार करारासह अनेक महत्त्वाच्या करारांवर यावेळी स्वाक्ष-या होणार आहेत.
Last Updated: Tuesday, October 22, 2013, 16:38
सध्या मॉस्कोमध्ये कडाक्याची थंडी आहे, अशात पंतप्रधान मनमोहन सिंग दोन दिवसाच्या रशिया दौऱ्यावर आहे. या थंडीच्या वातावरणात भारत-रशिया संबंधातील उब अजूनही कायम आहे.
Last Updated: Tuesday, October 22, 2013, 12:00
कॅमेऱ्यात कैद झालाय बॉम्बस्फोटा सारखा आत्मघाती हल्ला. हा हल्ला झालाय रशियात. रशियातील वोल्गोग्रँड शहरात एका बस मध्ये हा आत्मघाती हल्ला करण्यात आला आहे.
Last Updated: Tuesday, October 22, 2013, 11:38
पाहा अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामांच्या लांबलचक भाषणाचा काय परिणाम झालाय तो... वॉशिंग्टनमध्ये हेल्थ केअरसंदर्भात बोलत असलेल्या ओबामांच्या भाषणादरम्यान एक महिला चक्कर येता येता वाचलीय.
आणखी >>